ETV Bharat / state

'नॉनस्टॉप' आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी! स्वच्छता मोहिमेचे ७५ आठवडे पूर्ण

महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जनता आदराने आणि विश्वासाने पाहते. काही अधिकारी जनतेच्या या भावनांना सार्थ ठरवतात. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे असेच एक नाव आहे. त्यांनी गेले ७५ आठवडे एकही सुट्टी न घेता कोल्हापुरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

kolhapur
कोल्हापूर
author img

By

Published : Oct 4, 2020, 1:18 PM IST

कोल्हापूर - महानगरपालिकेला पदभार स्वीकारल्यानंतर एकही दिवस सुट्टी न घेतल्या आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छता मोहिमेचे ७५ आठवडे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यांना कोल्हापुरातील जनतेने दिलेल्या प्रतिसादामुळे कोल्हापूर कचरामुक्तिच्या दिशेने वाटचाल करत आहे. या स्वच्छता मोहिमेचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा...

आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली आहे

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, ही काळाची गरज आहे. हे कोरोनासारख्या आजारानेही दाखवून दिले आहे. गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर शहरात स्वच्छतेच्या बाबतीत कृतीशीलता आणि गतीशिलता आली आहे. याचे कारण म्हणजे सध्याचे महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी. आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी महानगरपालिका आणि लोकसहभागातून गेले 75 आठवडे स्वच्छता अभियान राबवले आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून स्वच्छता अभियान गतिमान केले आहे. दर रविवारी महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवी-सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेऊन आयुक्त स्वत: शहरात स्वच्छता करतात.

डॉ. कलशेट्टी यांनी ही संकल्पना राबवल्याने शहराच्या स्वच्छतेला नवी दिशा मिळाली आहे. आज या मोहिमेला 75 आठवडे पूर्ण झाले आहेत. दर रविवारी 3 ते 6 टन कचरा व प्लास्टिक गोळा करून नाले, ओढे, रस्ते आणि चौक स्वच्छ करण्यात आले आहेत. त्यांच्या पुढाकाराने शहरातील जयंती नदी आणि गोमती नद्यांना मिळालेले नाल्याचे स्वरुप आता बदलून गेले आहे. कित्येक वर्षांपासून घाण, दुर्गंधी आणि कचऱ्याचे साम्राज्य बनलेल्या या नाल्यांची स्वच्छता केल्याने आज या दोन्ही नद्या मुक्तपणे वाहात आहेत.

कोल्हापुरातील स्वच्छता अभियानामुळे शहरातील 124 चॅनेल व 54 नाले सफाईचे काम झाले आहे. रंकाळा तलाव परिसर, पत्तोडी घाट, पंचगंगा नदी घाट परिसर, अंबाई टँक, जयंती नदी, पंपिंग स्टेशन, शहरातील सर्वच प्रमुख उद्याने आणि रस्ते स्वच्छ झाले आहेत. यापुढेही कोल्हापूरकरांच्या सहभागातून या स्वच्छता अभियानातच्या मदतीने कोल्हापूर स्वच्छ, सुंदर व समृद्ध करण्याचा मानस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

महापुराचा धोका लक्षात घेऊन धावलेला देवदूत -

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीला त्यांनी जयंती नाल्याची सफाई हाती घेतली. लोकसहभाग, सामाजिक संस्था यांच्या मदतीने २५० टन कचरा एकट्या जयंती नाल्यातून बाहेर काढण्यात आला. २०१९ साली आलेल्या महापुराचे पाणी याच नाल्याच्या माध्यमातून शहरात घुसले होते. हे नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ केल्याने यावर्षी पुढील धोका टळला. अन्यथा शहरात मोठा प्रमाणात पाणी घुसून जीवितहानी झाली असती. त्यामुळे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांना यावर्षी महापुराच्या धोक्याचा साक्षात्कार झाला होता की काय? म्हणून ते कोल्हापूरांसाठी धावले, अशी भावना प्रत्येक कोल्हापूरकराच्या मनात आहे.

माझे घर-परिसर माझी जबाबदारी -

या स्वच्छता चळवळीत अनेकांना सहभाग नोंदवता येत नाही. मात्र, घरी राहूनही आपले घर व परिसर स्वच्छ ठेवत या चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न करा. ओला व सुका कचरा याचे विभाजन करून तो कचरा सफाई कर्मचाऱ्यांकडे द्या, असे आवाहन डॉ. कलशेट्टी यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.