ETV Bharat / state

Kolhapur MNC Shop Holder Agitation : कोल्हापूर मनपाच्या 'या' निर्णयाविरुद्ध गाळेधारकांचे अनोखे आंदोलन; आंदोलकांच्या मागण्या काय?

author img

By

Published : Feb 8, 2022, 5:12 PM IST

Updated : Feb 8, 2022, 5:33 PM IST

शहरात महापालिकेच्या गाळेधारकांनी भाड्याच्या मुद्द्यावरून आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. ( Kolhapur MNC Shop Holder Agitation ) कोल्हापूर महापालिकेच्या मिळकतीचे तब्बल २००० भाडेधारक गेली दोन महिने महापालिकेच्या धोरणामुळे भाडे भरलेली नाही आहेत. याबाबत अनेक वेळा आयुक्तांना भेटून भाडे भरून घेण्यासाठी निवेदन दिले.

Kolhapur MNC Shop Holder Agitation
कोल्हापूर मनपाच्या 'या' निर्णयाविरुद्ध गाळेधारकांचे अनोखे आंदोलन

कोल्हापूर - शहरात महापालिकेच्या गाळेधारकांनी भाड्याच्या मुद्द्यावरून आज अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. ( Kolhapur MNC Shop Holder Agitation ) कोल्हापूर शहरातील गाळे भाड्याच्या मुद्द्यावरून आज गाळेधारकांनी ताटात पैसे घेऊन छत्रपती शिवाजी चौक ते महानगर पालिका मोर्चा काढला.

आंदोलक माध्यमांशी बोलताना

आंदोलकांची काय म्हणणे?

रेडीरेकनर नुसार भाडे भरण्यास गाळेधारकांनी विरोध केला आहे. करार पद्धतीने भाडे भरून घ्या, म्हणून हे सर्व गाळेधारक मोर्चाद्वारे हातात पैशाची बंडलं घेतली. या आंदोलना दरम्यान गाळेधारकांनी महापालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच महापालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून आम्ही रोख रकमेने भाडे भरण्यासाठी आलो असल्याचं म्हटले आहे. या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या कोल्हापुरात सर्वत्र सुरू आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या मिळकतीचे तब्बल २००० भाडेधारक गेली दोन महिने महापालिकेच्या धोरणामुळे भाडे भरलेली नाही आहेत. याबाबत अनेक वेळा आयुक्तांना भेटून भाडे भरून घेण्यासाठी निवेदन दिले. मात्र, आयुक्तांनी दुर्लक्ष करत असल्याचे आंदोलक गाळेधारकांनी केला आहे. तर महापालिका २०१७ आणि २०१९च्या शासकीय आदेशाची भीती दाखवून अनेक दुकानधारकांची २०१२ आणि २०१५ पासूनचे भाडे भरून घेतले नसल्याचे देखील भाडे धारकांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Kolhapur Sugarcane Farm Fire : 30 एकरातील ऊसाला मोठी आग; पन्हाळा तालुक्यातील घटना

भाडधारकांची मागणी -

  1. महानगरपलिकेच्या या आडमुठे धोरणामुळे दोघांचेही नुकसान होत असल्याने २०१७पर्यंतचे भाडे विनादंड व्याजाशिवाय करार पद्धतीने घ्यावे
  2. प्रशासक व भाडेकरू मिळकत धारकांनी चर्चा करून मार्ग काढावा
  3. २०१९च्या आदेशानुसार कोल्हापूर महापालिका वर्गातील महापालिका असल्यामुळे अ ,ब, क या महापालिकांची नियमावली कोल्हापुरातील गाळे भाडेधारकांना लागू होऊ नये यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा

राजश्री शाहू लघु औद्योगिक असोसिएशन, पांजरापोळ औद्योगिक वसाहत, कोटीतीर्थ मार्केट व्यापारी असोसिएशन, एलिगंट हॉटेल महापालिका गाळेधारक संघटनांसह अन्य संघटनांनी हे आंदोलन केले.

Last Updated : Feb 8, 2022, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.