कोल्हापूर - महापुराच्या सकटाने अनेकांचे संसार उद्धस्त झाले. काही वर्षे आता कोल्हापुरकर आणि सांगलीकर मागे गेल्याचे सांगितले जात आहे. अनेकांना आता शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेल्याने अनेकांच्या जनावरांचा निवारा मोकळा झाला आहे. अशाच एका चिखली गावातील जयसिंग पाटील यांच्या गायी वाहून गेल्याने संसार उद्धस्त झाले आहेत.
गोठ्यांकडे पाहून येथील नागरिकांना अक्षरशः जीव खायला उठत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. जयसिंग पाटील यांच्या ४ गायी त्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेल्याने. दोन मुलांचे शिक्षण कसे होईल या चिंतेत ते आहेत. शिक्षण आणि संपूर्ण संसार ज्या गायींवर चालत होता त्या गायीच आता नसल्याने जगायचे सुद्धा मुश्किल झाले असल्याचे पाटील म्हणाले.