ETV Bharat / state

Corona third wave : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज.. सद्यस्थितीचा आढावा - Omicron Corona new Variant

कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची (Omicron virus in kolhapur ) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून आरोग्य यंत्रणा सुद्धा संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज (Preparation Combat of third wave of corona)झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत, याचा घेतलेला आढावा

third wave of corona in kolhapur
third wave of corona in kolhapur
author img

By

Published : Jan 4, 2022, 5:41 PM IST

कोल्हापूर - कोरोना आणि ओमायक्रॉन (Omicron virus in kolhapur ) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून आरोग्य यंत्रणा सुद्धा संभाव्य तिसऱ्या लाटेला (Corona third wave) तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमक्या काय उपाययोजना (Preparation Combat of third wave of corona) केल्या आहेत यावर एक नजर..

ऑक्सिजनची परिस्थिती -

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे. 185 मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता सध्या उपलब्ध आहे. जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे एकूण 17 प्रकल्प कार्यान्वित होणार होते. त्यातील 14 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. शिवाय लिक्विड ऑक्सिजन प्लांट (Liquid Oxygen Plant in kolhapur ) सुद्धा प्रस्तावित होते. त्यातील 7 पूर्ण झाले असून त्याद्वारे 111 मेट्रिक टन ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण केली आहे.

पालकमंत्री सतेज पाटील पत्रकार परिषदेत बोलताना
बेडची व्यवस्था -
जिल्ह्यात नॉन ऑक्सिजन 11 हजार तर 4 हजार ऑक्सिजन बेड सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय आणि खासगी असे 404 व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध आहेत. गरज भासल्यास आणखी बेडचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे.
रुग्ण संख्येवर एक नजर - कोल्हापूर जिल्ह्यात मागील सोमवारी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी 76 सक्रिय रुग्ण होते. रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास 97.16 टक्के होता. मात्र सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या 137 इतकी असून रुग्ण बरे होण्याचा दर 97.13 टक्के इतका आहे. जिल्ह्यात कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ओमायक्रॉनचे सुद्धा 2 रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

third wave of corona in kolhapur
लिक्विड ऑक्सिजन प्लांट
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वाढलेले रुग्ण -
कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर पहिल्याच लाटेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 52 हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील जवळपास 49 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले होते. जवळपास 1,700 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही एप्रिल 2021 पर्यंतची परिस्थिती होती मात्र, नंतर दुसरी लाट सुरू झाली यामध्ये एप्रिल ते डिसेंबर 2021 अखेर तब्बल दीड लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे 31 डिसेंबर अखेर एकूण 2 लाख 6 हजार 996 इतक्या लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 2 लाख 1 हजार 106 रुग्ण बरे झाले असून 5 हजार 799 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 118 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर 2 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. पहिल्या लाटेच्या (Corona third wave)तुलनेत दुसरी लाट आकडेवारीवरून खूपच भयंकर मानली जाते.

हे ही वाचा -Lockdown In Mumbai: रुग्णसंख्या 20 हजारावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन - महापौर

लसीकरण परिस्थिती -

सद्या जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination in Kolhapur district) सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात या वयोगटातील तब्बल 2 लाख 29 हजार मुलांचे लसीकरण होणार आहे. काल एका दिवसात 9 हजार 318 मुलांचे लसीकरण झाले आहेत. मात्र 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा विचार करायचा झाल्यास जिल्ह्यात 1 जानेवारी पर्यंत 30 लाख 14 हजार 400 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यातील 27 लाख 77 हजार 200 लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 19 लाख 31 हजार 594 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. जवळपास 70 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र आता ओमायक्रॉनचा धोका तसेच संभाव्य तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून अनेक जण पुन्हा लसीकरणासाठी (Vaccination in Kolhapur district) रांगा लावताना पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज 20 ते 40 हजारांच्या आसपास लोकांचे लसीकरण होईल असे नियोजन सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.