कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १० मतदार संघ येतात. २०१४ विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातून एकून 74 टक्के मतदान झाले होते. या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने ७३.६२ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यात २०१४च्या निवडणूकीत शिवसेनेने बाजी मारली होती. शिवसेनेचे ६ आमदार निवडून आले होते. तर भाजपचे २, राष्ट्रवादीचे २ आमदार निवडून आले होते. पूर्ण जिल्ह्यात काँग्रेसला आपले खाते सुद्धा खोलता आले नव्हते. यामध्ये शिवसेनेचे वर्चस्व कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली होती.
पक्ष | काँग्रेस | काँग्रेस | अपक्ष | अपक्ष | जनसुराज्य | राष्ट्रवादी | काँग्रेस | शिवसेना | काँग्रेस | राष्ट्रवादी |
मतदार संघ | कोल्हापूर दक्षिण | कोल्हापूर उत्तर | इचलकरंजी | शिरोळ | शाहुवाडी | कागल | हातकणंगले | राधानगरी | करवीर | चंदगड |
विजयी उमेदवार | ऋतुराज पाटील | चंद्रकांत जाधव | प्रकाश आवाडे | राजेंद्र यड्रावकर | विनय कोरे | हसन मुश्रीफ | राजुबाबा आवळे | प्रकाश आबिटकर | पी. एन. पाटील | राजेश पाटील |
1.17 - कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी
12.32 - कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून काँग्रेस ऋतुराज पाटील विजयाच्या उंबरठ्यावर
12.32 - इचलकरंजी मतदार संघातून अपक्ष प्रकाश आवाडे विजयाच्या उंबरठ्यावर
12.32 - कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेस चंद्रकांत जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
11.41 - राधानगरी मतदार संघात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर ६ मतांनी आघाडीवर
11.41 - हातकणंगले मतदार संघातून काँग्रेसचे राजीव बाबा आवळे २१९० मतांनी आघाडीवर
11.41 - शाहुवाडी मतदार संघातून शिवसेनेचे सत्यजित पाटील ६ हजार मतांनी आघाडीवर
11.41 - कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव १३ हजार मदानी आघाडीवर
11.41 - शिरोळ मतदार संघातून अपक्ष राजेद्र पाटील ११ हजार मतांनी आघाडीवर
11.41 - इचलकरंजी मतदार संघातून अपक्ष प्रकाश आवाडे २९ हजार मतांनी आघाडीवर
11.41 - चंदगड विधानसभा मतदार संघातून वंचित आप्पी पाटील आघाडीवर
11.41 - कागल विधानसभा मतदार संघातून हसन मुश्रीफ १३ हजार मतांनी आघाडीवर
11.41 - कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून ऋतुराज पाटील ११ मतांनी आघाडीवर
11.41 - करवीर मतदार संघातून काँग्रेसचे पी एन पाटील २५०० मतांनी आघाडीवर
10.31 - राधानगरी मतदार संघातून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर ४२१० मतानी आघाडीवर
10.30 - हातकणंगले मतदार संघातून जनसुराज्य पक्षाचे अशोक माने 2300 मतानी आघाडीवर
1029 - शाहुवाडी मतदार संघातून शिवसेनेचे सत्यजित पाटील ४ ००० मतानी आघाडीवर
10.28 - कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे चंद्राकात जाधव ८००० मतानी आघाडीवर
10.27 - शिरोळ मतदार संघातून अपक्ष राजेंद्र पाटील ५५० मतांनी आघाडीवर
10.26 - इचलकरंजी मतदार संघातून अपक्ष प्रकाश आवाडे १५000 मतानी आघाडीवर
10.25 - चंदगड मतदार संघातून वंचित घाडीचे आप्पी पाटील १३४ मतांनी आघाडीवर
10.23 - कागल विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ ७०० मतांनी आघाडीवर
10.22 - कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून ऋतुराज पाटील १६ हजार मतांनी आघाडीवर
10.21 - करवीर मतदार शिवसेनेचे चंद्रदीप नरके ५ हजार मतानी आघाडीवर
10.1 - चौथ्या फेरी आखेर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ ४६३ मतानी आघाडीवर
9.55 - कोल्हापूर उत्तर मतदार संघात चंद्रकात जाधव तीसऱ्या फेरी आखेर ८१८० मतानी आघाडीवर
9.49 - तिसऱ्या फेरी आखेर आमतदार हसन मुश्रीफ ८०० मतानी आघाडीवर
9.33 - राधानगरी मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर ८० मतानी आघाडीवर
9.31 - कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून दुसऱ्या फेरी आखेर ऋतुराज पाटील ६१५९ मतानी आघाडीवर
9.30 - इचलकरंजी मतदारसंघातून तिसऱ्या फेरी आखेर अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे आघाडीवर
9.28 - शाहुवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे सत्यजित पाटील 976 मतानी आघाडीवर आहेत
9.12 - हातकणंगले मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने २५०० मतानी आघाडीवर
9.04 - कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव ४९०० मतानी आघाडीवर
9.03 - इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे ५५०६ मतानी आघाडीवर
9.02 - कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील ३८०२मतानी आघाडीवर
8.59 - राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आबिटकर २५१९ मतानी आघाडीवर
8.58 - हातकणंगले मतदारसंघातून जनशुरांज्य पक्षाचे अशोकराव माने आघाडीवर
8.52 - कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील मतानी आघाडीवर
8.40 - इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे आघाडीवर
8.10 - कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पोस्टल मतमोजणील सुरुवात
08 - कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात
07 - विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पावसाचे सावट, कोल्हापुरात रिमझिम पावसाला सुरुवात
संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे ती विधानसभा निवडणुकीच्या निकालाची. कोल्हापुरात सर्वच मतमोजणी केंद्रावर आता मतमोजणी प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे. पण या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच याठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून याबाबत राज्यात सर्वात जास्त मतदान झालेल्या करवीर मतमोजणी केंद्रावरून अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी