ETV Bharat / state

बेळगावात शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नडिगांचा हल्ला, घटनास्थळी तणाव - kannad organisation belgaon attack shivsena karyakarta

बेळगाव शहरातील रामलिंग खिंड येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. तसेच रुग्णवाहिकेचा बोर्डही तोडण्यात आला. पोलीस संरक्षण असतानाही हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

Kannada organization attacks Shiv Sena vehicle in Belgaum
बेळगावात शिवसेनेच्या गाडीवर कन्नड संघटनेचा हल्लाबोल
author img

By

Published : Mar 12, 2021, 3:33 PM IST

Updated : Mar 12, 2021, 7:09 PM IST

कोल्हापूर - शिवसेना पदाधिकाऱ्याच्या गाडीवर व रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बेळगाव शहरातील सम्राट अशोक चौक परिसरात घडली. इतकेच नव्हे शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फसण्याचा प्रयत्न करण्यात आला.

घटनास्थळावरील दृश्ये.

संतप्त प्रतिक्रिया -

बेळगाव शहरातील रामलिंग खिंड येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. तसेच रुग्णवाहिकेचा बोर्डही तोडण्यात आला. पोलीस संरक्षण असतानाही हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यावेळी गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न होत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले आणि पळवून लावले.

हेही वाचा - पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू; शाळा महाविद्यालयेही बंद

यानंतर खडेबाजारचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेळगावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी सुरू केला आहे. शुक्रवारी दुपारी सम्राट अशोक चौकाजवळ शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोखण्यास गेलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर तसेच शिवसैनिक प्रविण तेजम यांनाही रोखण्याचा प्रयत्न झाला. यावेळी जोरदार वादावादीही झाली. दरम्यान, या प्रकारामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रकरणानंतर शिवसेनेचे आंदोलन -

दरम्यान, या प्रकरणानंतर कन्नड संघटनेविरोधात शिवसेना आक्रमक झालेली आहे. कोल्हापूर बसस्थानकावर शिवसेनेचे आंदोलन सुरू आहे. कर्नाटक राज्याची बससेवा शिवसेनेने बंद केली आहे. कर्नाटक विरोधात कोल्हापूरमध्ये जोरदार घोषणाबाजीही देण्यात येत आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात शिवसैनिक घुसले आहेत. कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाला शिवसेना प्रत्युत्तर देत आहे. बेळगावमध्ये मराठी फलकांना काळे फासल्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली दिसत आहे. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.

हेही वाचा - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : सचिन वझेंची नियंत्रण कक्षात बदली

Last Updated : Mar 12, 2021, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.