ETV Bharat / state

२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन; संविधानाचा 'सांगावा' कोल्हापूरचा तरुण पोहचवतोय घराघरात आणि मनामनात - Engineer Rajvaibhav Shobha Ramchandra

Indian Constitution Day 2023 : भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेनं सध्याची राज्यघटना स्वीकारली. तर भारतीय संविधानिक मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावी म्हणून कोल्हापूरच्या सोन्याची शिरोली (Sonyachi shiroli) गावचा तरुण अवघा महाराष्ट्र पिंजून काढतोय.

Indian Constitution Day 2023
संविधान दिन 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 7:49 PM IST

Updated : Nov 25, 2023, 10:54 PM IST

संविधानाचा 'सांगावा' कोल्हापूरचा तरुण पोहचवतोय घराघरात आणि मनामनात

कोल्हापूर Indian Constitution Day 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधान प्रसार करण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबरला 'संविधान दिन' साजरा केला जातो. भारतीय संविधानिक मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावी, यासाठी कोल्हापूरच्या सोन्याची शिरोली गावचा तरुण राजवैभव हा अवघा महाराष्ट्र पिंजून काढतोय. लहानपणापासूनच समाजकार्याची आवड असणारा तरुण, वडील गावचे माजी सरपंच त्यामुळं समाजकार्याचा वारसा त्याला घरातूनच मिळाला. इंजिनियर असलेल्या राजवैभवच्या (Rajvaibhav) मनात समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ होती. यातूनच ज्या संविधानावर अखंड देश उभा आहे, ती संविधानिक मूल्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची खुणगाठ त्यानं मनाशी बांधली.

राज्यभरात संविधानाची बीजे रुजवण्याचा प्रयत्न : 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान समितीनं 'भारतीय संविधान' स्वीकारलं. यामुळं 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या भारतीय संविधानाची मूल्ये, नागरिकांमध्ये किती रुजली आहेत हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. मात्र भारतीय संविधानिक मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावी, म्हणून राज्यातील वाड्या-वस्त्या, पाडा, शाळा महाविद्यालय यासह तरुणांचा घोळका कुठे दिसेल तिथं हा तरुण त्यांच्या भाषेत त्यांना भारतीय संविधान समजावून सांगतो. 'संविधान संवादक' म्हणून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणं, दैनंदिन जीवनात संविधानाचा अंगीकार करणं, अंमलबजावणी करणं आणि संविधान विरोधी घटना आणि घडामोडीत विधायक हस्तक्षेप करणं या चार सूत्रांवर 'संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र' हा गेली 8 वर्षे राज्यभरात संविधानाची बीजं रुजवण्याचा प्रयत्न करत आहे.

लोकराजा शाहू संविधान प्रशिक्षण केंद्राची स्थापना : संविधान चळवळीला व्यापक स्वरूप यावं, यासाठी राज्यभरातील मान्यवर विचारवंत सामाजिक कार्यकर्ते यांचं मार्गदर्शन घेऊन राजवैभवने आपल्या गावात 'राजर्षी शाहू संविधान प्रशिक्षण केंद्रा'ची स्थापना केली. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना संविधानावरील व्याख्याने, भारुड, बडबड गीते, नाटक आणि चित्रपटातून संविधानिक साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहेत. 40 दिवसांच्या या प्रशिक्षण वर्गात समाजातील सर्व घटक सहभागी होत आहेत. यंदाच्या राजर्षी शाहूंच्या जयंती पासून राजवैभवचा 'एक हजार दिवस संविधानाचा जागर' राज्यभर सुरू आहे.

हेही वाचा -

Indian Constitution : भारतीय संविधानात झाल्या आहेत अनेक दुरुस्त्या.. जगातील सर्वात मोठे संविधान.. 'अशी' आहे खासियत..

Special session of Parliament : संसदेचं विशेष अधिवेशन आहे तरी काय एवढं खास...

Constitution Day Celebration : संविधान दिनी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले संविधानाचे कलमं

Last Updated : Nov 25, 2023, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.