ETV Bharat / state

'ऑपरेशन जलप्रलय' अनुषंगाने कोल्हापूर विमानतळाची भारतीय तटरक्षक दलाकडून पाहणी

गोवा येथील पथकाचे कमांडंट अमित कोरगावकर आणि कमांडंट अशोक यादव यांनी आयसीजी चेतकच्या माध्यमातून कोल्हापूर, रत्नागिरी परिसराची आणि विशेष करून कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली.

कोल्हापूर विमानतळ
कोल्हापूर विमानतळ
author img

By

Published : May 28, 2020, 12:33 PM IST

कोल्हापूर - गोवा येथील पथकाचे कमांडंट अमित कोरगावकर आणि कमांडंट अशोक यादव यांनी आयसीजी चेतकच्या माध्यमातून कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. पाहणीनंतर भारतीय तट रक्षक दलाने समाधान व्यक्त केल्याचे विमानतळ प्राधिकरण संचालक कमल कटारिया यांनी सांगितले.

गतवर्षी आलेल्या महापुराच्या अनुषंगाने यंदाच्या पावसाळ्यात सर्व दक्षता पूर्ण असावी आणि बचाव कार्याची गरज पडली तर योग्य नियोजन असावे, याबाबत बैठक पार पडली. तसेच गोवा येथील पथकाचे कमांडंट अमित कोरगावकर आणि कमांडंट अशोक यादव यांनी आयसीजी चेतकच्या माध्यमातून कोल्हापूर, रत्नागिरी परिसराची आणि विशेष करून कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली.

विमानतळावरील एएनएस, एटीएम/एटीएस, रनवे, टॅक्सी वे, एप्रॉन, रिफाईलिंग सुविधा, एमईटी सुविधा, ई व एम सेवा व इतर सर्व सेवा आगामी पावसाळ्याला सामोरे जाण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

आगामी पावसाळ्यात कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर विमानतळ पूर्णपणे सक्षम असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, कोल्हापुरात जर गतवर्षीसारखी परिस्थिती निर्माण झालीच, तर आम्ही दोन तासांत बाचावकार्यासाठी कोल्हापुरात हजर होऊ असेही त्यांनी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.