कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. काल (शुक्रवार) कोल्हापूरात दिवसभरात 1 हजार 855 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 299 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1 हजार 366 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा 12 हजार 500 वर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 147 इतकी झाली आहे. गेल्या आठवड्यापासून नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, आज पुन्हा नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारी
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 147 वर पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 13 हजार 552 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. काल (शुक्रवार) जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 500 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 4 हजार 095 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या
1 वर्षाखालील - 233 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 4810 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 10091 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 74349 रुग्ण
51 ते 70 वर्ष -32273 रुग्ण
71 वर्षांवरील - 8391 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 1 लाख 30 हजार 147 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या
1) आजरा - 73
2) भुदरगड - 38
3) चंदगड - 41
4) गडहिंग्लज - 59
5) गगनबावडा - 12
6) हातकणंगले - 238
7) कागल - 58
8) करवीर - 318
9) पन्हाळा - 106
10) राधानगरी - 69
11) शाहूवाडी - 42
12) शिरोळ - 76
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 154
14) कोल्हापुर महानगरपालिका - 546
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 25
हेही वाचा - राज्यात अनलॉकला सुरुवात; कोरोना रुग्णसंख्येत काही अंशी वाढ