ETV Bharat / state

मेघोली तलाव दुर्घटनेत एका महिलेसह 11 जनावरांचा मृत्यू; जवळपास 300 हेक्टर शेतीचे नुकसान

भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघु पाटबंधारे तलाव फुटल्याची घटना काल 1 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तात्काळ या परिसराला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शिवाय शेतीची मोठे नुकसान झाले असून, एका महिलेसह जवळपास 11 जनावरांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार
author img

By

Published : Sep 2, 2021, 4:00 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघु पाटबंधारे तलाव फुटल्याची घटना काल 1 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तात्काळ या परिसराला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शिवाय शेतीची मोठे नुकसान झाले असून, एका महिलेसह जवळपास 11 जनावरांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई बाबतच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

माहिती देताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार

तलावाला आधीपासून गळती; स्थानिकांची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती

मेघोली लघु पाटबंधारे तलावाला गेल्या अनेक दिवसांपासून गळती होती. याबाबत गावकऱ्यांनी संबंधितांना माहिती दिली होती. आज सकाळी जिल्हाधिकारी रेखावार यांनीही नुकसानीची पाहणी केली आणि इथल्या स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर नागरिकांनीही तलावाला गळती होती याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आधीचे फोटो किंव्हा व्हिडिओ असतील तर द्यावेत असे आवाहन रेखावार यांनी केले आहे. दुर्दैवाने काल 1 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा तलाव फुटून परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय महिलेसह जवळपास 11 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

दोन ते 3 तासात तलाव झाला रिकामा

मेघोली प्रकल्प फुटल्याने पाण्याच्या प्रवाह इतका जोरदार होत्या ज्यामुळे अवघ्या 2 ते 3 तासांतच संपूर्ण तलाव रिकामा झाला आहे. त्यामुळे शेतीचे तर नुकसान झालेच आहे. शिवाय आता या प्रकल्पावर अवलंबून असलेली शेतीही आता संकटात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासन गतिमान झाले असून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.

हेही वाचा - भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटला; एका महिलेचा मृत्यू, परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.