ETV Bharat / state

कोल्हापुरातील लॉकडाऊनच्या मागणीवरून महाडिक-पाटील आमने-सामने - satej patil on kolhapur lockdown

कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. परिस्थिती बिघडत चालली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, पुढील दहा दिवस जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी महाडडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

kolhapur lockdown
कोल्हापूर लॉकडाऊन मागणीवरून महाडिक-पाटील आमने सामने
author img

By

Published : Jul 16, 2020, 12:38 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात कडक लॉकडाउन करा, अशी मागणी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. मात्र, पालकमंत्री यांनी लॉकडाऊनची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही कोल्हापूरमधील नागरिकांसाठी चिंता वाढवणारी बाब असली तरी, जिल्हाधिकारी दौलत देसाई कोणता निर्णय घेणार, हे महत्त्वाचे आहे. विशेष बाब म्हणजे महापौर निलोफर आजरेकर यांनी सुद्धा शहरामध्ये लॉकडाऊनची मागणी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. परिस्थिती बिघडत चालली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, पुढील दहा दिवस जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एका बाजूला उद्योग संकटात असला तरी नागरिकांचा जीव महत्वाचा आहे. जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका उद्भवू नये, करोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाडिक यांनी केली आहे. तर दुसरीकडे पालकंमत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात टाळेबंदीची गरज नसल्याची भूमिका यापूर्वीच मांडली आहे. याउलट महाडिक यांनी मागणी करत, पुन्हा एकदा आव्हानात्मक भूमिका स्पष्ट केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.