ETV Bharat / state

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी आजचा दिवस आहे विशेष, कारण... - अंबाबाईची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना

आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या दिवसाचे काय आहे महत्त्व, घटनेचा कसा आहे इतिहास वाचा सविस्तर...

करवीर निवासिनी
करवीर निवासिनी
author img

By

Published : Sep 26, 2020, 4:42 PM IST

Updated : Sep 26, 2020, 5:15 PM IST

कोल्हापूर - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली कोल्हापूरची अंबाबाई ही लाखो भाविकांची आराध्य दैवत.. 305 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 1715 मध्ये मोगलाईच्या काळात अनेक देवळे उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच मूर्ती विटंबनाच्या काही ठिकाणी घटना घडल्या. त्याकाळी अंबाबाई मंदिरात असा प्रकार होऊ नये म्हणून पुजारी आणि भाविकांनी मूर्ती भीतीपोठी मंदिराजवळ असलेल्या कपिलतीर्थ येथे पुजाऱ्याच्या घरी लपवून ठेवली. त्यानंतर 26 सप्टेंबर 1715 रोजी नरहरभट सावगावकर यांना झालेल्या दृष्टांन्ताप्रमाणे करवीर संस्थानंचे छत्रपती संभाजी दुसरे यांच्या आज्ञेने सिदोजी घोरपडे (गजेंद्रगडकर) यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली. तो आजचा हा दिवस (२६ सप्टेंबर). या ऐतिहासिक घटनेला आज 305 वर्षे पूर्ण झाली आहेत.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी आजचा दिवस आहे विशेष

विशेषतः करवीर निवासिनीच्या भक्तांनी आवर्जुन साजरा करावा असा सण. २६ सप्टेंबर १७१५ ला मोगलाईच्या काळात आक्रमकांपासून‌ लपवून श्रीपूजकांच्या घरी लपवलेली श्री अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान झाली तो हा दिवस. १७१० मध्ये श्रीमन्महाराणी ताराराणी सरकारांनी करवीर संस्थानची स्थापना केली. त्यानंतर १७१५ साली नरहरभट सावगावकर यांना देवीचा दृष्टांत झाला की, आता मला पुन्हा सिंहासनावर विराजमान करा. त्यांनी हा दृष्टांत पन्हाळगडावर श्रीमन्महाराज शंभू छत्रपती (दुसरे) यांना विदित केला. हुजुरस्वारीच्या हुकुमावरून श्रीमंत सिदोजी घोरपडे सरकार यांनी २६ सप्टेंबर १७१५ रोजी विजया दशमीच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान केली.

हेही वाचा - मराठा आरक्षण: कोल्हापुरात शालेय विद्यार्थ्यांचे दंडवत आंदोलन

यावर्षी या प्रसंगाला ३०५ वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना संकटामुळे भव्य दिव्य नसला तरी साधेपणाने सुंदर सोहळा मंदिरात आज पार पडला. या निमित्ताने श्रीमंत यशराज घोरपडे यांच्या हस्ते अभिषेक झाला. त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, एन.डी जाधव यांच्या हस्ते घोरपडे सरकार यांचे प्रतिनिधी श्रीमंत यशराज घोरपडे गजेंद्रगडकर सरकार, सावगावकर प्रधान यांचे प्रतिनिधी विशाल प्रधान, श्रीपूजक प्रतिनिधी माधव मुनीश्वर, शिरीष मुनीश्वर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवाजीराव जाधव यांनी स्वागत केले तर ॲड. प्रसन्न विश्वंभर मालेकर यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व मांडले. यानंतर महेश जाधव यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले व कार्यक्रमाची सांगता झाली. यानिमित्ताने करवीरनिवासिनीची सालंकृत विशेष पूजा बांधून संपूर्ण मंदिर फुलांनी व रांगोळ्यांनी सजवण्यात आले आहे. या कार्यक्रमात देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी, सूयश पाटील, गणेश नेर्लेकर-देसाई यांच्यासह देवस्थान समितीचे कर्मचारी, श्रीपूजक उपस्थित होते.

हेही वाचा - सुधारित कृषी विधेयकाची होळी; नाफेड, एफसीआयचे गोडावून घशात घालायचा केंद्राचा डाव - राजू शेट्टी

Last Updated : Sep 26, 2020, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.