ETV Bharat / state

मिशन बिगीन अगेन: हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉज सुरू... पण 'या' अटीवर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासून गेल्या चार महिन्यापासून हॉटेल्स, लॉजिंग पूर्णपणे बंद होते. तर हा व्यवसाय ठप्प असल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले होते. सध्या देशातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकच्या टप्प्यात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

hotels-guest-houses-and-lodges-open-with-condition-in-kolhapur
हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉज सुरू...
author img

By

Published : Jul 8, 2020, 3:34 PM IST

कोल्हापूर- राज्य शासनाने जाहीर केलेल्या मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात आजपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्यास सशर्त परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशान्वये ही परवानगी दिली आहे. त्यानुसार कोल्हापुरात बहुतांश हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस मालकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉज सुरू...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासून गेल्या चार महिन्यापासून हॉटेल्स, लॉजिंग पूर्णपणे बंद होते. तर हा व्यवसाय ठप्प असल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले होते. सध्या देशातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकच्या टप्प्यात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासनसुद्धा प्रयत्न करत आहे. त्यानुसार आजपासून राज्यातील हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू झाली आहेत. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाचे स्वागत करत असून लवकरच रेस्टॉरंटला परवानगी द्यावी, अशी मागणी देखील करत आहेत. हॉटेल व लॉजसारख्या ठिकाणांचा सध्या क्वारंटाईन सेंटर म्हणून वापर होत आहे. व्यवसाय सुरू करण्यास अडचणी आहेत. कामगारांना परत बोलवावे लागेल देखभाल दुरुस्तीची कामे करावी लागतील त्यात आठवडा जाईल. असे देखील हॉटेल मालक सांगतात. गेल्या तीन महिन्यापासून हॉटेल्स बंद आहेत. राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करुन आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ, असे सयाजी हॉटेलचे व्यवस्थापक मुकेश रक्षित यांनी सांगितले.

हेही वाचा- राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड, आंबेडकरी समाजात संतापाची लाट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.