कोल्हापूर - जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. शहरात आज सकाळपासूनच उकाडा वाढला होता. त्यातच दुपारी तीन नंतर ढगाळ वातावरण होतं आणि संध्याकाळी सहानंतर शहरात काही प्रमाणामध्ये पाऊस झाला. पण आजरा राधानगरी गारगोटी या भागात मुसळधार पाऊस झाला.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कलिंगड, काजू, आंबा या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी लॉक डाउनमूळ पिकं शेतातच उभी आहेत. त्यातच वळवाचा पाऊस पडल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पण या पावसाने उकाड्याने हैराण झालेले मात्र चांगले सुखावले आहेत.