कोल्हापूर - गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहरातील रस्ते आज ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. तर काही जण रेनकोट मध्ये दिसत आहेत. पण धो-धो पडणाऱ्या पावसापासून बचावासाठी जनावरांनी सुद्धा छत्रीप्रमाणे एका झाडाचा आसरा घेतल्याचा फोटो सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातील हा फोटो असून झाडाखाली जवळपास 10 ते 12 भटकी जनावरे पावसापासून बचाव करताना दिसत आहेत.
मुंबई, नाशिक, सातारा आणि आता कोल्हापुरमध्ये मुसळधार पाऊस पडत असून कोल्हापुरच्या जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा आणि वारणेच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे.