कोल्हापूर - गगनबावड्यात मुसळधार पाऊस दुपारी तीन वाजल्यापासून सुरू आहे. तसेच कोल्हापूर शहरातही दुपारपासून ढगाळ वातावरण होते. मार्च महिन्यातच गगनबावड्यात मुसळधार पावसाने नागरिक सुखावले आहेत.
दरम्यान, गारगोटी परिसरातसुद्धा सोमवारी दुपारी पावसाने हजेरी लावली होती.