कोल्हापूर : एकाही नेत्याला या तरुणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसून आले आहे. एकानेही साधी विचारपूर केली नाही. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत हे उपोषण मागे घेणार नसून, जोपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
अंध बांधव सुद्धा बसले सोबत: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रोहन मगदूम याने सुरू केलेल्या या आंदोलनस्थळी एकाही नेत्याने भेट दिली नाही. शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनाही याबाबत कल्पना असून त्यांनीही तरुणाच्या आंदोलनस्थळी भेट दिली नाही. अनेकांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. स्वतः रोहनने याबाबत माहिती दिली आहे. या आंदोलनस्थळी गावातील ग्रामस्थ मात्र मोठ्या संख्येने भेटून जात आहेत. नेत्यांनी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे गावातील अंध बांधव सुद्धा या आंदोलनस्थळी भेट देऊन त्याच्यासोबत बसले आहेत. गेली 11 महिने रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. मात्र आपल्या घराकडे जाणारा हा रस्ता मंजूर होऊन सुद्धा पूर्ण होत नसल्याने या गावातील तरुणाने उपोषणाचे पाऊल उचलले आहे.
जोपर्यंत रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही: रोहन मगदूम या तरुणाने उपोषणाला 15 फेब्रुवारी पासून गावातच सुरुवात केली. आपण कोणत्याही परिस्थितीत शांत बसणार नाही असे त्यांने म्हटले आहे. शिवाय जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत आपण हे उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा त्याने दिला आहे. ज्या मतदारसंघात रोहनने आंदोलन सुरू केले आहे. तेथील एकाही नेत्याने त्याच्या आंदोलन स्थळी भेट दिली नाही. मात्र आज सकाळीच आम आदमी पक्षाकडून मात्र त्याच्या या आंदोलनाची दखल घेतली. आंदोलनस्थळी ते भेट देणार आहेत.
हेही वाचा :Kolhapur News नोकरीवर सुट्टी घेऊन तरुण बसला रस्त्यासाठी उपोषणाला शिरोळ तालुक्यातील घटना