कोल्हापूर - हाथरस बलात्कार प्रकरणात केवळ जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख याचे निलंबन करणे हे नाटक आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार पी. एन. पाटील यांनी केली. ते काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनात बोलत होते.
हाथरस बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ व पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापूर काँग्रेसच्यावतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार पी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व महापौर निलोफर आजरेकर, शारंगधर देशमुख हे सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे खरेच साधू आहेत का? एका महिलेवर अत्याचार होत असताना ते बघत बसतात. त्यामुळे तेच दोषी असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारा कायदा भाजपाने आणला. काँग्रेस सत्तेत आल्यावर कायदा मोडून काढू, असे देखील आमदार पाटील यांनी सांगितले. दिल्लीतील निर्भया प्रकरण झाले, त्यावेळी भाजपाने मनमोहन सरकारने टीका केली. मात्र आता भाजपाने देश संपवला आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.
हेही वाचा - ग्राहक देवो भव, कोल्हापूरात पहिल्या ग्राहकाचे हार घालून स्वागत
हेही वाचा - मराठा आरक्षण प्रश्नी कोल्हापुरात न्यायिक परिषदेला सुरुवात