कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी चुकून बोललो असेल पाटील यांनी जाहीर करावे. तसेच मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अन्यथा फौजदारी खटला दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. माझ्यावर आरोप केवळ विरोधक म्हणून करण्यापेक्षा 'इधर उधर बाते मत करो, काफिला कैसे लुटा ये बताओ, असा टोला देखील मुश्रीफ यांनी पाटलांना लगावला आहे.
आर्सेनिक अल्बम औषध दोन रुपयाला मिळतो. पण जिल्हा परिषदेने यांची खरेदी 23 रूपयाला केली. यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप चंद्रकात पाटलांनी केला होता. यावर मुश्रीफ म्हणाले, आयुष्य मंत्रालयाच्या शासन निर्णयाप्रमाणे आर्सेनिक खरेदी करण्याचा निर्णय घेतला व खरेदी प्रक्रिया सुरू केली. अपेक्षित दर न आल्यामुळे त्यांचा निर्णय रद्द करून जिल्हा पातळीवर घ्यावा, असे आदेश काढले. पण १५ दिवसांनी माहिती न घेता मुद्दाम माझी व माझ्या ग्रामविकास विभागाची बदनामी करण्याच्या उद्देशाने पाटील यांनी ग्रामविकास विभागाने २३ रुपये अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून भ्रष्टाचार केला व त्याच गोळ्या दोन रुपयांनी मी खरेदी करून कोथरूड मतदारसंघांमध्ये दिल्या आहेत, असे विधान केले.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : अपरिचित 'कसबा बीड'; महादेवाचं प्राचीन मंदिर अन् शिलाहाराचा गणपती
हेही वाचा - 'दख्खनचा राजा ज्योतिबा' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कोठारे व्हिजन्सच्या नव्या मालिकेचा शुभारंभ