कोल्हापूर - विजेची 60 हजार कोटी थकबाकी ( Electricity bill issue in Kolhapur ) आहे. चालू बिल भरून सहकार्य करावे, अशी चर्चा शेट्टी यांच्यासोबत झाली होती. पैसे वसूल झाले नाहीत तर राज्य अंधारात जाईल अशी भीती ऊर्जा मंत्र्यानी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेट्टींनी आंदोलनाचा फेरविचार करावा, अशी विनंती असेल असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif on electricity issue ) यांनी म्हंटले. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की राजू शेट्टी यांचे पत्र प्रसारमाध्यमातून कळले आहे. आपण ऊर्जा मंत्र्यासोबत बैठक घेऊ. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Swabhimani Shetkari Sanghata president ) हे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ( Raju Shetti Agitation ) मोर्चा काढणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ बोलत होते.
हेही वाचा-Vishal Phate Scam : विशाल फटे प्रकरणातील फसवणुकीचा आकडा 100 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता
घटक पक्षांना निर्णयांमध्ये सामावून घेण्याबाबत विनंती करू
हसन मुश्रीफ म्हणाले, की घटक पक्षांबाबतचे पक्षश्रेष्ठींचे निर्णय आहेत. आम्ही मुख्यमंत्री, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलून घटक पक्षांना अनेक निर्णयांमध्ये सामावून घेण्याबाबत बोलू. घटक पक्षांना कोणत्याही पद्धतीने कोणत्याच निर्णयात सामावून घेत नसल्याचा आरोप आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात तीन मंत्री झाले. पण दुसऱ्या महिन्यापासून कोरोना संकट आले. कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना मदत हे निर्णय घे तले आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी लवकरच लाभ होईल असे सांगितले आहे. सर्वकाही पूर्वपदावर येईल, असेही म्हणत ग्रामविकास मंत्र्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा-Neelam Gorhe On Hijab Controversy : 'मुलींच्या स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणू नये'
145 ची जुळणी झाल्याशिवाय सरकार नाही पडणार
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif on Mahavikas Aghadi stability ) म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा आणि सरकार पडण्याचा संबंध मला कळला नाही. मात्र महाराष्ट्रात 145 आमदारांच्या पाठिंब्याची जुळणी झाल्याशिवाय सरकार पडत नाही. महाविकास आघाडी हे 5 वर्ष चालणार आहे. यात कोणतीही शंका नाही असेही मुश्रीफ यांनी म्हटले.
हेही वाचा-Congress Protest Against Modi : फडणवीसांच्या घराबाहेरचं आंदोलन मागे, पटोले ्हणाले, "मोदींनी महाराष्ट्राची..."
मराठा आरक्षण प्रश्न न्यायालयात असल्याने मर्यादा ( Hasan Mushrif on Maratha Reservation )
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायायलायत आहे. त्यामुळे काही मर्यादा आहेत. पुन्हा उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या सोबत बसून चर्चा करता येईल. त्यामुळे संभाजीराजेंनी उपोषणाचा निर्णय थांबवावा. चर्चा झाल्यानंतर काही साध्य झाले नाही, तरच पुढचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले.