ETV Bharat / state

पेट्रोल दराचे शतकवीर नरेंद्र मोदी; हसन मुश्रीफांची टीका - नरेंद्र मोदी लेटेस्ट न्यूज

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होत असताना, भारतात मात्र, सतत पेट्रोल दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीबांचे कंबरडेच मोडले आहे. या पेट्रोल दरवाढीचा सर्वसामान्य जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पेट्रोल दराचे शतकवीर नरेंद्र मोदी
पेट्रोल दराचे शतकवीर नरेंद्र मोदी
author img

By

Published : Feb 15, 2021, 1:26 PM IST

Updated : Feb 15, 2021, 3:10 PM IST

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आज पेट्रोल दर लिटरला शंभर रुपयाच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शतकवीर ठरले आहेत. त्यांनी मारलेली पेट्रोल दराची ही सेंचुरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी आहे, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूरमधील कागल येथे पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

पेट्रोल दराचे शतकवीर नरेंद्र मोदी; हसन मुश्रीफांची टीका
खनिज तेलाचे दर कमी भारतात पेट्रोल दरवाढ आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होत असताना, भारतात मात्र, सतत पेट्रोल दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीबांचे कंबरडेच मोडले आहे. या पेट्रोल दरवाढीचा सर्वसामान्य जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता लोकचं मोदींना योग्य ते उत्तर देतील, असे वक्तव्य मुश्रीफ यांनी केले.

मोदींकडून शेतकऱ्यांची थट्टा
हाडे गोठवणार्‍या थंडीतही शेतकरी दिल्लीमध्ये गेल्या ७० ते ७५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, पंतप्रधानांना शेतकऱ्यांशी संवाद साधायला वेळ नाहीये. उलट आंदोलनजीवी म्हणत मोदींनी शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याची टीका मुश्रीफ यांनी केली.

Last Updated : Feb 15, 2021, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.