ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी निवडणुक स्वतंत्र लढविणार- हसन मुश्रीफ यांची घोषणा

कोणत्याही क्षणी निवडणुक लागली तर त्या लढण्याची राजकीय पक्षांची तयारी असायला हवी. पक्ष संघटन व मजबूत करण्यासाठी असे प्रयत्न करावे लागतात, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
author img

By

Published : Aug 30, 2021, 7:55 PM IST

Updated : Aug 30, 2021, 8:17 PM IST

कोल्हापूर- आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या विधानसभा, कोल्हापूर महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा नारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रविवारी पक्षाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की अनेक वर्षांपासून आम्ही नगरपालिका, महानगरपालिका नगरपंचायत या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढवतो. आता महाविकासआघाडी झाली असली तरी यापूर्वी सर्व निवडणुका स्वतंत्र लढविल्या आहेत. स्वतंत्र लढवल्यानंतर पुन्हा एकत्र येऊन आम्ही सत्ता स्थापन करतो, असा इतिहास आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. भविष्यात महाविकास आघाडी सरकारने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्या आम्ही लढू शकतो. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीचे जमले नाही तर निवडणुका स्वतंत्र लढवावी लागेल. त्यामुळे स्वबळाची तयारी केली पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी निवडणुक स्वतंत्र लढविणार

हेही वाचा-कितीही छळ करा; मी घाबरणारा किंवा झुकणारा नाही, एकनाथ खडसे भाजपवर बरसले

पक्ष विस्ताराचा सर्वांना अधिकार-

राजकीय पक्ष हा नेहमी जागृत पाहिजे. कोणत्याही क्षणी निवडणुक लागली तर त्या लढण्याची राजकीय पक्षांची तयारी असायला हवी. पक्ष संघटन व मजबूत करण्यासाठी असे प्रयत्न करावे लागतात. पक्ष विस्ताराचा सर्वांना अधिकार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये म्हणाले होते. आज महाविकास आघाडी सरकारचे आहे. मात्र पुढील वेळी ते एका पक्षाचे सरकार असे ते म्हणाले होते. त्या निर्णयाचे मी स्वागत करून 2024 साली राष्ट्रवादीचे सरकार असेल असे म्हणालो होतो, अशी मुश्रीफ यांनी आठवण करून दिली.

हेही वाचा-बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून सलग पाच तास चौकशी

हा तर मुश्रीफांचा अधिकार

पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्या स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हेदेखील पक्ष वाढवित आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढलो होतो. मात्र एका विचारधारेने आम्ही एकत्र आलो. गेल्या पंधरा वर्षांपासून हेच सुरू आहे. निवडणुका आणि नंतरच्या हालचाली या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे निवडणुका या वेगवेगळ्या लढाव्या लागतील. त्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करता या निवडणुका स्वतंत्र लढल्या जातील.

हेही वाचा-ईडीच्या कारवाईवर खासदार भावना गवळी म्हणाल्या, हा तर जुलमीपणा...

दरम्यान, जिल्ह्यातील अंतर्गत निवडणुका या स्वबळावरच लढणार असल्याची राष्ट्रवादीने घोषणा केल्यानंतर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Last Updated : Aug 30, 2021, 8:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.