कोल्हापूर - जिल्ह्यात आज आणखी 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सलग 4 ते 5 दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण बरे होताना पाहायला मिळत आहे. एकूण रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाली आहे. तब्बल 355 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गुरुवारी (3 जून) दिवसभरात 301 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले त्यातील 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर इतर सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. वाढलेले 15 रुग्ण मिळून आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 645 वर पोहोचली आहे.
आजपर्यंत एकूण 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालरात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 284 रुग्ण अद्याप उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुद्धा स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे उरलेले कोरोनाबाधित रुग्ण सुद्धा लवकरच बरे होऊन आपल्या घरी जातील, असा विश्वास सुद्धा डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
वयोगटानुसार दाखल रुग्णांची संख्या -
1 वर्षांच्या आतील रुग्ण : 0
11 ते 10 वर्ष : 54
11 ते 20 वर्ष : 82
21 ते 50 वर्ष : 430
51 ते 70 वर्ष : 76
71 वर्षांवरील : 2
एकूण : 645
मयत : 6
बरे झालेले रुग्ण : 355
अॅक्टिव्ह रुग्ण : 284