ETV Bharat / state

अन्यथा पुण्यासारखी वेळ कोल्हापूरवर येईल; पालकमंत्री सतेज पाटलांचा इशारा...

मागील परिस्थितीचा आढावा घेतला तर महापालिकेकडे २२०० रुग्णांवर उपचार करण्याची यंत्रणा तयार होती. तर सध्या ३३०० रुग्णांवर उपचार करण्याची सोय महापालिकेने सज्ज ठेवली आहे

सतेज पाटील
सतेज पाटील
author img

By

Published : Apr 17, 2021, 6:56 PM IST

कोल्हापूर- संचारबंदीच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण फिरू नये. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. मुंबई पुण्यासारखी वेळ कोल्हापूरवर येईल, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिला आहे.

अन्यथा पुण्यासारखी वेळ कोल्हापूरवर येईल

कोरोना परिस्थितीचा आढावा

पालकमंत्री सतेज पाटील यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्याबाबतची बैठक ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पार पडली. यावेळी बैठकीला महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे उपायुक्त मंगेश शिंदे नितीन देसाई यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

३३०० रुग्णांवर उपचार करण्याची सोय महापालिकेकडे
मागील परिस्थितीचा आढावा घेतला तर महापालिकेकडे २२०० रुग्णांवर उपचार करण्याची यंत्रणा तयार होती. तर सध्या ३३०० रुग्णांवर उपचार करण्याची सोय महापालिकेने सज्ज ठेवली आहे. तसेच महापालिका कार्यक्षेत्रात ऑक्सिजनचा पुरवठा संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. कोल्हापुरातील आयसोलेशन हॉस्पिटल जवळ ऑक्सिजन प्लांट सुरू करणार असून, येत्या वीस दिवसात हा प्लांट सुरू होईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.

पन्नास टक्के ऑक्सीजन बेड रुग्णसेवेत
कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत, आयसोलेशन हॉस्पिटल, कसबा बावडा, डीओटी याठिकाणी रूग्णालयात जवळपास चारशे चाळीस ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत. तसेच खाजगी हॉस्पिटल यांच्याकडे साडे सहाशे ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत. सध्या त्यातील पन्नास टक्के ऑक्सीजन बेड रुग्णसेवेत असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा कंटेनमेंट झोन तयार करण्यात येणार आहेत. तसेच प्रादुर्भाव क्षेत्रातील लोकांच्यावर निर्बंध घालणार असल्याचेही पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.