ETV Bharat / state

पालकमंत्री सतेज पाटील विशेष विमानाने सातव यांच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना - राजीव सातव मृत्यू

खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त समजताच दिवसभर पालकमंत्री सतेज पाटील दिल्लीतील तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. अंत्यसंस्कारासाठी पालकमंत्री सतेज पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याबरोबर हुबळी येथून विशेष विमानाने नांदेडसाठी रवाना झाले.

पालकमंत्री सतेज पाटील
पालकमंत्री सतेज पाटील
author img

By

Published : May 16, 2021, 10:31 PM IST

कोल्हापूर - काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर हिंगोली येथे अंत्यसंस्कार होणार आहे. अंत्यसंस्कारासाठी पालकमंत्री सतेज पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याबरोबर हुबळी येथून विशेष विमानाने नांदेडसाठी रवाना झाले. आज (रविवारी) रात्री ते नांदेड येथे पोहोचणार असून उद्या (सोमवार) सकाळी हिंगोली येथे होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत.

सातव यांच्याशी सतेज पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध

खासदार राजीव सातव यांचा देशभरातील काँग्रेसच्या अनेक युवक कार्यकर्त्यांशी संपर्क होता. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. २०१३साली सतेज पाटील यांच्या वाढदिवशी सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी धान्य जमविण्यात आले होते. राजीव सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमानंतर हे धान्य ट्रकद्वारे दुष्काळग्रस्तांकडे पाठविण्यात आले होते. सातव यांच्या निधनाची बातमी कळताच सतेज पाटील यांनी महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज हरपला, त्यांच्या जाण्यामुळे आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली. सातव यांच्या निधनाचे वृत्त समजताच दिवसभर पालकमंत्री सतेज पाटील दिल्लीतील तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी चर्चा झाल्यावर ते सायंकाळी सहाच्या सुमारास हुबळीला गेले. तेथून एच. के. पाटील यांच्यासोबत विशेष विमानाने नांदेडला गेले. उद्या सकाळी सातव यांच्या हिंगोली येथे होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी विविध नेत्यांसोबत पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.