ETV Bharat / state

CM in Kolhapur : शिंदे साहेब आज तुमच्यामुळे एसटीने फुकट फिरतोय, एका आजोबांनी मानले आभार - अंबाबाईचे दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेताना एक आजोबा भेटले. यावेळी आजोबांनी एसटीच्या मोफत प्रवासाच्या निर्णयावरुन आभार मानले. तसेच शिंदे यांचे कौतुक देखील केले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. आजोबांनी एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

FREE TRAVEL TO ST
FREE TRAVEL TO ST
author img

By

Published : Jul 15, 2023, 10:52 PM IST

कोल्हापूर : गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांनी 40 आमदारांसह भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. यानंतर गेल्या वर्षभरात युती सरकारने अनेक निर्णय घेतले आहे. यात 75 वर्षावरील ज्येष्ठ व्यक्तींना एसटी प्रवास सरकारने मोफत केला. शिवाय महिलांना अर्धे तिकीट केले. यामुळे अनेक जणांना या निर्णायचा फायदा झालेला आहे. त्याचाच प्रत्यय आज कोल्हापुरात आला.

ठाकरे यांचा आवडता जिल्हा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पेटाळा मैदान येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता जिल्हा होता. कोणत्याही प्रचाराचा, दौऱ्याचा शुभारंभ बाळासाहेब ठाकरे हे आई अंबाबाईचे दर्शन घेऊन करत होते असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा : पक्ष संघटनेसाठी त्यांनी शिवसैनिकांचे मार्गदर्शनही केले. यानंतर सभा आटपून रात्री त्यांनी थेट करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर गाठले. त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी शिंदेंना शाल, श्रीफळ दिले. यानंतर एकनाथ शिंदे पुढे जात असतानाच एका 75 वर्षे वृद्ध आजोबांनी त्यांना हाक मारली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याजवळ जात आजोबांशी संवाद साधला. यावेळी या वृद्ध आजोबांनी मला कोल्हापूर शहराबद्दल बोलायचे आहे. तेही मुंबईमध्ये येऊन, असे म्हणत त्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

एसटीने आजोबा फिरताय फुकट : मुख्यमंत्र्यांनी आपण जरूर भेटायला यावे, असे उत्तर या आजोबांना दिले. यानंतर आजोबांनी आपल्या सरकारने 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधील प्रवास मोफत केल्याबद्दल आभार मानले. तसेच या निर्णयामुळे मी सध्या सगळीकडे फुकट फिरत आहे, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. हे ऐकून मुख्यमंत्री, त्यांच्यासोबत असलेले सर्वजण कौतुकाने हसू लागले.

हेही वाचा - Aditya Thackeray Criticizes Shinde : ना खाती, ना इज्जत! आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.