कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी गुन्हा कबूल करण्यासाठी 50 लाखांची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा सचिन अंधुरेने न्यायालयात केला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वीरेंद्र तावडेंच्या सांगण्यावरून सचिन अंदुरे आणि अमोल काळे यांनी अंबाबाई मंदिर, पानसरे कार्यालय परिसरात रेकी केल्याची आरोपींनी माहिती दिली. कोल्हापूर जवळील जंगलात एका शेडमध्ये एअर पिस्तूलचे प्रशिक्षण घेतल्याचीही माहिती अंदुरने यावेळी दिली.
दुर्जनांचा नाश करण्यासाठी आरोपींनी रेकी केल्याची माहिती. एक लेखक आणि दोन पुरोगामी नेत्यांची अंदुरे आणि काळे यांनी रेकी केली होती. हत्येसाठी रचलेल्या कटात गणेश मिस्किन, सचिन अंदुरे, अमित बद्दी यांचा सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.