ETV Bharat / state

Narayan Rane On Goshala : कोकणात गोशाळा निर्माण करणार; लोकोत्सवातून पर्यावरण जागृती : नारायण राणे - Sumangalam Panchamahabhut Lokotsava

कणेरी मठ येथे आयोजित केलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरण जागृती करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी कोकणात गोशाळा बांधणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Narayan Rane On Goshala
Narayan Rane On Goshala
author img

By

Published : Feb 26, 2023, 5:48 PM IST

कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव द्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याचा हा मठाचा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. यावेळी त्यांनी आपण कोकणात गोशाळा निर्माण करणार असेही म्हंटले. अध्यक्षस्थानी दत्तात्रेय होसबाळे होते. यावेळी व्यासपीठावर खा. आण्णासाहेब जोल्ले, आ. महेश शिंदे ,काड सिद्धेश्वर स्वामी, कर्नाटक विधान परिषद सभापती बसवराज होराठी, शशिकला जोल्ले, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जि .प मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

आपण कोकणात गोशाळा निर्माण करणार : राणे म्हणाले, या मठाद्वारे निरपेक्ष वृत्तीने अनेक देश विधायक कामे झाली आहेत. या महोत्सवाद्वारे प्रदुषण जागृती बाबत उल्लेखनीय कार्य झाले असून या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी झोकून देवून काम केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले तसेच या मठातील गोपालन आदर्शवत असून या मठाच्या धरतीवर आपण कोकणात गोशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.

निसर्गानुरूप जीवन शैलीचा अंगीकार : सुखी जीवनासाठी पंचमहाभूत तत्वाला अनुसरून आचरण करावे असे दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, पृथ्वीसोबत आपला व्यवहार कसा आहे ? याचे सर्वांनी अतःर्मुख होवून अवलोकन करावे. प्रत्येकाने निसर्गानुरूप जीवन शैलीचा अंगीकार करावा. सुखी जीवनासाठी पंचमहाभूत तत्वाला अनुसरून आचरण करावे. भविष्यातील धोका ओळखून पर्यावरण जागृतीचा संदेश या महोत्सवाद्वारे देशात किंबहुना जगात जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी काड सिद्धेश्वर स्वामी, बसवराज होराठी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या समारोप कार्यक्रम प्रसंगी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक उपस्थित होते.

हेही वाचा - Mumbai Project Bhoomipujan : शांघाय नाही तर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबई करायची आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.