कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. आजच्या(ललित पंचमी) दिवशी अंबाबाई तिची प्रिय सखी त्र्यंबोली देवीला भेटण्यासाठी जाते, अशी अख्यायिका आहे. त्या पार्श्वभूमीवर अंबाबाईची हत्तीवर अंबारीमध्ये बसलेल्या स्वरूपातील विशेष पूजा बांधण्यात येते.
हेही वाचा - नवरात्रोत्सव 2019 : तिरुपतीवरून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू
ललिता पंचमीच्या दिवशी दुपारी बारा वाजण्याअगोदर देवीचा श्रृंगार केला जातो. कामाक्ष वध करून करवीरच्या पुर्वेला रुसून बसलेल्या त्र्यंबुली देवीचा रूसवा काढण्यासाठी देवी निघते.