कोल्हापूर: डॉ. प्रमोद सावंत (C M Dr. Pramod Sawant ) यांनी कोल्हापूर दौऱ्यात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Kolhapur Assembly by-election) प्रचारक म्हणून झाले होते सहभागी. या भेटीत गोव्यात भाजपला या मिळालेल्या यशाचे तसेच त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर घडलेल्या विविध घडामोडींवर सावंत यांनी चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांच्यासमवेत चर्चा केली. डॉ. सावंत यांचे वैद्यकीय शिक्षण कोल्हापूरात झाल्याने त्यांचे एक वेगळे नाते आहे.
यशानंतर सावंत यांनी अंबाबाईचं दर्शन घेत अंबाबाईच्या चरणी अभिषेक करत आशीर्वाद घेतले होते. त्यांच्या निवडणुकीच्या वेळी कोल्हापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे अनेक सहकारी गोव्यात गेले होते. तसेच त्यांच्या साखळी मतदार संघात जाऊन त्यांचा प्रचारही केला होता. डॉ. सावंत यांचे नेहमीच महाराष्ट्र राज्याचे आणि पर्यायाने कोल्हापूरशी घनिष्ठ संबंध आहेत म्हणूनच त्यांचे विरोधक त्यांचा उच्चार सावंतवाडी सरकार या नावाने करतात.