कोल्हापूर Ganeshotsav २०२३ : कोल्हापूरला कलेचं माहेरघर म्हटलं जातं. येथील लोक सण-उत्सव परंपरेचं पालन करून दिमाखात साजरे करतात. आता अवघ्या काही दिवसांवरती आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोल्हापुरी फेट्यांना मागणी वाढली आहे.
कोल्हापुरी फेट्यांना सर्वात जास्त मागणी : समाज एकत्र यावा यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गेल्या १२५ वर्षांत या गणेशोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झालं आहे. गणेशोत्सव जवळ येऊन ठेपल्यानं सर्वच गणेश मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी तयारीला लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाप्रमाणेच घराघरातील गणेश मूर्तींना सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केलीय. या सर्वांमध्ये सर्वात जास्त मागणी आहे ती कोल्हापुरी फेट्यांना.
बाप्पासाठी खास सर्वात मोठा फेटा तयार : आपला लाडका बाप्पा अधिक सुंदर दिसावा यासाठी लोकं कोल्हापुरी फेटे मोठ्या प्रमाणात विकत घेत आहेत. यामुळे फेटे तयार करणाऱ्यांचीही लगबग वाढलीय. कोल्हापुरातील एका मंडळानं तर आपल्या बाप्पासाठी खास सर्वात मोठा फेटा तयार करून घेतला आहे.
कोल्हापुरी फेट्यांना परदेशातूनही मोठी मागणी : कोल्हापुरातील पाटील कुटुंब, छोट्या २ इंचाच्या गणोबापासून तर १० फूट पर्यंतच्या गणपतीसाठी फेटे तयार करण्याचं काम गेल्या ३ महिन्यापासून करत आहे. या कुटुंबातील कारागीर अत्यंत सुबक व शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यास करून हातानं फेटे तयार करतात. यामुळे या फेट्यांना परदेशातून देखील मोठी मागणी आहे.
फेट्यांना मोठी बाजारपेठा उपलब्ध झाली : कोरोना काळात अनेक जणांचा रोजगार गेला. तर दुसरीकडे सरकारनं चिनी वस्तूंवर बंदी घातल्यानं स्थानिक कलाकारांना त्यांची कला समोर आणण्यासाठी व्यासपीठ मिळालं. यामुळे कोल्हापुरी, पुणेरी, मावळा, पेशवाई असे अनेक प्रकारचे फेटे पुन्हा एकदा बाजारात दिसू लागले. या फेट्यांना मोठी बाजारपेठा उपलब्ध झाल्यानं नागरिकांकडून देखील याची मोठी मागणी वाढली आहे.
हेही वाचा :
- Ganeshotsav २०२३ : रायगडावरील दिमाखदार मेघडंबरीत विराजमान ‘लालबागचा राजा’; पाहा व्हिडिओ
- Ganeshotsav 2023: 'दगडूशेठ'च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचं मंगळवारी उद्घाटन, राष्ट्रीय सरसंघचालकांच्या हस्ते होणार 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना
- Kolhapur Ganeshotsav Meeting: एक दिवस तुमचा , पण 364 दिवस आमचे...साउंड ऑपरेटरांना पोलीस अधीक्षकांचा बैठकीत दम