ETV Bharat / state

Sawant's Kolhapur Connection : कोल्हापूरातील पहिली निवडणूक ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री; सावंत यांचे कोल्हापुर कनेक्शन

एखादा व्यक्ती कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी ( the first election in Kolhapur ) म्हणून निवडुन येतो आणि पुढे जाऊन सलग दोन वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो असे सांगितले तर कदाचित कोणाला पटणार नाही, मात्र हे खरे आहे. गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa Chief Minister Pramod Sawant) यांनी आज दुसऱ्यांदा ( second time Chief Minister) शपथ घेतली. त्यांचा खरा राजकीय प्रवास हा कोल्हापुरातून सुरू झाला. पाहुयात त्यांच्या कोल्हापूर कनेक्शनचा (Kolhapur connection of Pramod Sawant) आढावा

Kolhapur
कोल्हापूर
author img

By

Published : Mar 28, 2022, 1:52 PM IST

कोल्हापूर: प्रमोद सावंत हे बारावी नंतर वैद्यकिय शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. (Kolhapur connection of Pramod Sawant) येथील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांनी 1992 साली वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या शिक्षणाला प्रारंभ केला. 1997 साली त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पदवी घेतली. आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांच्या खऱ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. कारण शिक्षण घेत असतानाचा त्यांनी महाविद्यालयात सगळ्यात आधी जनरल सेक्रेटरी अर्थात जीएस पदाची निवडणूक लढले ( the first election in Kolhapur )आणि ही निवडणुक ते भरघोस मतांनी विजयी होत जीएसही झाले. इथेच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा; दरवर्षी न चुकता दर्शन: डॉ. प्रमोद सावंत यांचे कोल्हापूरातील अनेक किस्से आहेत. इथे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. काही जण आजही कोल्हापूरात आहेत तर काही कामानिमित्त बाहेर आहेत. शिक्षण घेत असताना त्यांनी खूप दंगा मस्तीही केल्याचे सांगितले जाते. काळा तर त्यांचे आवडते ठिकाण. सायंकाळी नेहमी ते रांकळ्यावर जायचे. सावंत यांची अंबाबाई वर प्रचंड श्रद्धा आहे. शिक्षण घेताना सुद्धा ते नेहमी दर्शनासाठी जायचे.आता सुद्धा ते अंबाबाईचे दर्शन घेऊन गेले. दरवर्षी न चुकता ते इथे येत असतात तसेच त्यांच्या काही जुन्या मित्रांना पण भेटतात.

गोव्यातील राजकीय प्रवासाला सुरुवात : सावंत यांनी वयाच्या 38 व्या वर्षी 2012 मध्ये प्रथम भाजपकडून साखळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवली. त्यावेळी 21 हजार 592 मतांपैकी 14 हजार 255 मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. त्यांच्या विरोधात त्यावेळी काँग्रेसचे प्रताप गौण हे उमेदवार होते. नंतर 2017 मध्ये सुद्धा त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. यात त्यांना 10 हजार 58 मते मिळाली आणि ते दुसऱ्यांना आमदार झाले. त्यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेकडून धर्मेश सगलानी यांनी जोरदार टक्कर दिली होती.

विधानसभेचे अध्यक्ष : सावंत पुढे विधानसभेचे अध्यक्ष झाले. दरम्यान मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आणि सावंत यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत मार्च 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. तीन वर्षे त्यांनी या पदावर असताना अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. त्यामुळेच 2022 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपने एकहाती सत्ता खेचली आणि पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्यावरच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. आज त्यांनी दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

हेही वाचा : Goa CM Pramod Sawant : प्रमोद सावंत दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री; जाणून घ्या राजकीय प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.