कोल्हापूर- जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शुक्रवारी सकाळी 10 पासून रात्री 8 पर्यंत 47 नवे रुग्ण वाढले आहेत. या कालावधीत एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोल्हापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1129 वर पोहोचली आहे. यापैकी 804 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 302 झाली आहे.
शुक्रवारी वाढलेल्या 47 रुग्णांमध्ये विशेष म्हणजे पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावातल्या एकाच कुटुंबातील 8 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गावासह पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरले आहे.चंदगड तालुक्यात सुद्धा दिवसभरात 16 नवे रुग्ण सापडले आहेत.
शुक्रवारी रात्री 8 वाजे पर्यंत तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 95
भुदरगड- 79
चंदगड- 137
गडहिंग्लज- 122
गगनबावडा- 7
हातकणंगले- 23
कागल- 59
करवीर- 47
पन्हाळा- 40
राधानगरी- 74
शाहूवाडी- 191
शिरोळ- 20
नगरपरिषद क्षेत्र- 131
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-79
असे एकूण 1104
इतर जिल्हा व राज्यातील 25 असे मिळून एकूण 1129 रुग्णांची जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 1129 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 804 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 23 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 302 इतकी आहे.