कोल्हापूर : संतोष शिंदे यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये माजी नगरसेविका आणि पोलिस अधिकाऱ्याचा उल्लेख होता. या दोघांना बेड्या घालण्यात पोलिसाना यश आले आहे. कोल्हापूर पोलिसांच्या टीमने दोघांना कर्नाटकातील विजापूरमधून ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघांचा ताब्यात घेण्यासाठी पोलीस पुणे परिसरात पथक गस्त घालत आहे.
पोलिसांचे पथक आरोपांची मागावर : रविवारी दिवसभर पोलिसांची दोन पथके या आरोपींच्या मार्गावर होती. दरम्यान पोलिसांनी माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकारी राहुल राऊतला अटक केली आहे. कर्नाटकातील विजापूर येथून या दोघांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अन्य दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक पुणे परिसरत फिरत आहे.
चिठ्ठीत मिळाले नगरसेविकेचे नाव : गडिंग्लज येथील उद्योजक संतोष शिंदे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली जात होती. खंडणीच्या आणि ब्लॅमेलच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. दरम्यान संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यात ज्या महिलेने शिंदे यांच्याविरोधात खोट्या बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव लिहिले होते. या दोघांमुळे आत्महत्या केल्याचे संतोष शिंदे म्हणाले होते. चिठ्ठी नाव असलेली महिला ही माजी नगरसेविका आहे. तसेच महिलेचा साथीदार पोलीस अधिकारी असून त्याचे नाव राहुल राऊत आहे. दरम्यान संतोष शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे सजताच या माजी नगरसेविका आणि तिचा साथीदार यांनी गडिंग्लज येथून पलायन केले होते. पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकारी राहुल राऊत, विशाल बाणेकर, संकेत पाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले.
संतोष शिंदेंवरही गुन्हा दाखल : संतोष शिंदेवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. या अहवालानुसार पत्नी आणि मुलगा यांना शिंदे यांनी विष पाजले होते. त्यानंतर त्यांचा गळा चिरून खून केला होता. त्यानंतर स्वतःविष प्राशन केले आणि स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले. यामुळे मृत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गजानन सरगर करीत आहेत. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा तीन्ही मृतदेहांवर नदीवेस येथील स्मशानभूमीत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
वकील पत्र घेऊ नका : बलात्काराचा खोटा गुन्हा आणि खंडणीची मागणी करून शिंदे, त्यांची पत्नी व मुलास आत्महत्येला प्रवृत्त करुन, माणुसकीला काळिमा फासलेल्या आरोपींचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असे आवाहन येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे. हे निवेदन गडहिंग्लज अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश तेली यांना देण्यात आले आहे. या संदर्भात आज शिष्टमंडळाने पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांची ही भेट घेतली आहे.
हेही वाचा -