कोल्हापूर - जिओच्या बाबतीत जे झाले तेच बाजार समित्यांबाबत होणार आहे आणि आता त्याची सुरुवात झाली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायदे आपल्या विरोधातील आहेत, हे चांगले ओळखले आहे. त्यामुळे करेंगे या मरेंगे या उद्देशानेच हे सर्वजण आंदोलनात उतरले असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी दिल्लीमध्ये गेले होते. या आंदोलनाची माहिती देण्याबाबत आणि एकूणच परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी कोल्हापूरात आयोजन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिओच्या बाबतीत जे झालं तेच बाजार समित्यांबाबत होणार; त्याची सुरुवात झालीय - शेट्टी - माजी खासदार राजू शेट्टी न्यूज
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.