कोल्हापूर - अनेक मंडळी गोकुळच्या कारभारावर टीका करतात, त्याची दखल घेण्याची गरज नाही. खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असाल तर लक्षात ठेवा महादेवराव महाडिक सही सलामत आहे, असे प्रति आव्हान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांना दिले. गोकुळ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. चक्रव्युहाच्या बाहेर जायचे का नाही, हे महाडिक ठरवणार. त्यामुळे विरोधकांनी कोणत्याही अविर्भावात राहू नये, येणारा काळ ठरवेल आणि तो काळ कोणाच्या हातात नसतो.
हेही वाचा - हा तर पालकमंत्र्यांच्या हट्टाचा बळी; धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
हेही वाचा - सत्ताधाऱ्यांना पराभव दिसत आहे; मुन्ना महाडिकांच्या टीकेला बंटी पाटलांचे प्रत्युत्तर
हेही वाचा - 'कोल्हापुरात सत्तारूढ गटाने आत्मविश्वास गमावला, म्हणून कोर्ट कचेरी' - सतेज पाटील