कोल्हापूर - बेळगावचे वादग्रस्त माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज (मंगळवार) करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. वादग्रस्त अश्लील सीडीप्रकरणी जारकीहोळी यांची काही दिवसांपूर्वी हकालपट्टी झाली आहे. त्यांनतर रमेश जारकीहोळी पहिल्यांदाच कोल्हापूरात अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. सायंकाळी पाच वाजता त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दरम्यान, यावेळी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधींना व्हिडीओ शूटिंग करू नये, असेही जारकीहोळी यांनी म्हंटले. दर्शन घेऊन परत बाहेर पडताना काहीही न बोलता ते निघून गेले.
एका युवती सोबतचा अश्लील व्हिडिओ झाला होता व्हायरल
काही दिवसांपूर्वी रमेश जारकीहोळी यांचा एका युवतीसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आला होता. नोकरीच्या आमिषाने त्यांनी युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळी यांनी हा आरोप केला होता. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. सद्या त्यांचे हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, या वादग्रस्त प्रकरणानंतर त्यांनी पहिल्यांदाच कोल्हापूरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेतले.
हेही वाचा-एमपीएससीचे संघीकरण, भाजपधार्जिणा प्रचार -मंत्री यशोमती ठाकूर यांचा गौप्यस्फोट