ETV Bharat / state

कोल्हापुरात माजी नगरसेवकाचे रस्त्यावरील खड्ड्यात अभ्यंगस्नान

author img

By

Published : Nov 14, 2020, 7:06 PM IST

फुलेवाडी रिंगरोडवर प्रचंड खड्डे पडल्यामुळे येथे वारंवार अपघात होत असतात. नवीन रिंग रोड बरोबर या जुन्या रिंग रोडचे डांबरीकरण होणे गरजेचे होते. पण महापालिका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे याचा निषेध म्हणून खड्ड्यांमध्ये अभ्यंग स्नान करत आंदोलन करण्यात आले.

former-corporator-took-a-bath-in-a-pothole
कोल्हापुरात माजी नगरसेवकाचे रस्त्यावरील खड्ड्यात अभ्यंगस्नान

कोल्हापूर- गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याला कंटाळून आज एक माजी नगरसेवकाने खड्ड्यातच आंघोळ केली. ऐन दिवाळीच्या दिवशी भल्या पहाटे माजी नगरसेवकाने अभिनव पद्धतीने हे आंदोलन केल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून फुलेवाडी रिंगरोडचे काम रखडले होते. वारंवार आंदोलन केल्यानंतर रस्ता एक वर्षापूर्वी नवीन करण्यात आला. कनेरकरनगर ते पाण्याची टाकीपर्यंतचा जुना रिंग रोड अद्यापही समस्यांच्या गर्तेत आहे.

या रस्त्यावरून आजही कनेरकर नगर, लक्ष्मी बाई साळोखे कॉलनी, अरुण सरनाईक नगर, नीचीते नगर येथील नागरिक ये-जा करत असतात. प्रचंड खड्डे पडल्यामुळे येथे वारंवार अपघात होत असतात. नवीन रिंग रोड बरोबर या जुन्या रिंग रोडचे डांबरीकरण होणे गरजेचे होते. पण महापालिका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. याबाबत प्रशासनाला निवेदन देवूनही कार्यवाही झाली नाही, याचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी क्रांतिसिंह नाना पाटील नगर विकास कृती परिषदेने खड्ड्यांमध्ये अभ्यंग स्नान करत आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माजी नगरसेवक अमोल गणपतराव माने, सुहास आजगेकर, समीर वर्णे यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा- आता 'शिवाजी पार्क' नव्हे "छत्रपती शिवाजी महाराज पार्क" म्हणा; पालिकेने लावल्या नामविस्ताराच्या पाट्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.