ETV Bharat / state

पूर बाधितांना जागा दिली तरी स्थलांतर नाहीच, चिखलीतील गावकऱ्यांच्या आहेत अनेक समस्या - कोल्हापूर महापूर न्यूज

2019 नंतर यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात महापुराचा फटका नागरिकांना बसला आहे. यावर्षी तर केवळ 3 ते 4 दिवसात झालेल्या पावसात 2019 पेक्षाही मोठा महापूर आला. तीन दिवसांच्या पावसाने इतका मोठा पूर येत असेल तर याला काहीतरी इतर गोष्टी सुद्धा कारणीभूत आहेत, असे इथंल्या नागरिकांनी म्हंटले आहे. शिवाय कोल्हापूर रत्नागिरी मार्ग तसेच पुणे बंगळुरू महामार्गाची उंची सुद्धा वाढली असल्याने एकप्रकारे नदीच्या प्रवाह बदलास कारणीभूत ठरला आहे.

चिखलीतील गावकरांच्या आहेत अनेक समस्या
चिखलीतील गावकरांच्या आहेत अनेक समस्या
author img

By

Published : Jul 29, 2021, 9:06 AM IST

Updated : Jul 29, 2021, 11:07 AM IST

कोल्हापूर - यावर्षी सुद्धा कोल्हापुरात महापुरामुळे आंबेवाडी आणि चिखली गावातील नागरिकांना महापुराचा मोठा फटका बसला. 2019 मध्ये गावातील अनेकांची घरं कोसळली अनेकांची जणावरं वाहून गेली. यापूर्वी सुद्धा या दोन्ही गावांमध्ये मोठं नुकसान झाले होते. त्यामुळे इथल्या रहिवाशांना कायमस्वरूपी स्थलांतर करण्यासाठी जागा देण्यात आल्या आहेत. प्रत्येकवेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते मग तरी सुद्धा इथले नागरिक स्थलांतर का करत नाहीत, याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

पूर बाधितांना जागा दिली तरी स्थलांतर नाहीच,
सोनतळीला शासनाने जागा दिली, मात्र आमची शेती चिखलीत शेती; मग काय करायचे? :
कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसल्यानंतर चिखली गाव पाण्याखाली आले, त्यामुळे त्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यावर, गावकऱ्यांनी आम्हाला स्थलांतर करायला कोणतीही अडचण नाही. आम्ही कधीही स्थलांतर करायला तयार आहोत. मात्र आमचा उदरनिर्वाह ज्या माध्यमातून होतोय ती शेती चिखली गावात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्लॉट देण्यात आले आहेत, तिथून चिखली मध्ये दररोज ये-जा करून शेती कशी परवडणार ? अशा प्रतिक्रिया सुद्धा इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्या. शिवाय जरी दिलेल्या प्लॉटवर घर बांधायचे झाले तर त्याचे अद्याप प्रॉपर्टी कार्ड निघत नाही. घर बांधायला जरी बँकेत कर्ज काढायला गेले तर बँकेत काहीही दखल घेत नाहीत. त्यामुळे आम्ही काय करायचे? असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला.
महापुराचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी उपाययोजना कराव्यात :
2019 नंतर यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात महापुराचा फटका नागरिकांना बसला आहे. यावर्षी तर केवळ 3 ते 4 दिवसात झालेल्या पावसात 2019 पेक्षाही मोठा महापूर आला. तीन दिवसांच्या पावसाने इतका मोठा पूर येत असेल तर याला काहीतरी इतर गोष्टी सुद्धा कारणीभूत आहेत, असे इथंल्या नागरिकांनी म्हंटले आहे. शिवाय कोल्हापूर रत्नागिरी मार्ग तसेच पुणे बंगळुरू महामार्गाची उंची सुद्धा वाढली असल्याने एकप्रकारे नदीच्या आडवा बांधच बांधल्याचा प्रकार झाला असल्याचेही कारण पूरग्रस्तांनी दिले आहे. त्यामुळे शासनाने याकडे सुद्धा अभ्यास करून योग्य ते उपाययोजना कराव्यात, अशा प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

2019 च्या तुलनेत कमी नुकसान :

यावर्षी सुद्धा गावातील अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. 2019 मध्ये शंभरच्या आसपास घरं जमीनदोस्त झाली होती. यावेळी सुद्धा अनेकांची घरं पडली असल्याने नागरिक रस्त्यावर आले आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या महापुरात आलेल्या पाण्याचा अंदाज असल्याने आणि प्रशासनाच्या वेळोवेळी मिळालेल्या सुचनेमुळे अनेक नागरिकांनी स्थलांतर केले होते तर जनावरांना सुद्धा सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते. त्यामुळे 2019 च्या तुलनेत यावर्षीच्या महापुरात कमी नुकसान झाले आहे.

Last Updated : Jul 29, 2021, 11:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.