कोल्हापूर - महापुराचा फटका जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळघरांनासुद्धा बसला आहे. अनेक गुऱ्हाळघर अक्षरशः पाण्यात वाहून गेल्याने त्यांची नव्याने उभारणी करावी लागणार असल्याने गुऱ्हाळघर मालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यासाठी सरकारने विशेष तरतूद करून आम्हाला आर्थिक मदत करावी, कर्जमाफीसुद्धा करावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आणि गुऱ्हाळघर मालकांची बाजारसमितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. शिवाय या मागण्यांचे निवेदनसुद्धा यावेळी बाजारसमितीकडे देण्यात आले.
हेही वाचा - सांगली, कोल्हापुरातील महापुराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 400 हून अधिक गुऱ्हाळघर आहेत. यातील बहुतांश गुऱ्हाळांना महापुराचा फटका बसला आहे. त्यामुळे ही गुऱ्हाळघरे पुन्हा नव्याने उभा करण्याचे मोठे संकट आता समोर आले आहे. ही गुऱ्हाळघरे जवळपास आठ ते दहा दिवस पूर्णपणे पाण्यात राहिल्यामुळे संपूर्ण गुऱहाळघरे नव्याने उभा करण्याचा संकट यांच्यावर आला आहे. त्यामुळे शासनाने घरमालकांना विशेष तरतूद करून आर्थिक मदत करावी. ज्यांची ज्यांनी कर्ज काढूनही गुऱ्हाळघर उभा केले आहेत. त्यांची कर्जमाफी करावी. यासह अनेक मागण्यांचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन यांच्याकडे दिले आहे.
हेही वाचा - वाघेरी ग्रामस्थ मंडळाचाही पूरग्रस्तांना मदतीचा हात; मुंबईस्थित गावकऱ्यांचेही योगदान
जिल्ह्यातील हजारो हेक्टर उसाचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सरकारने काढलेल्या जीआरमध्येसुद्धा दुरुस्ती करून नवीन जीआर काढावा. सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. अनेक गुऱ्हाळघर पूर्णपणे पडली आहेत. अडचणीत सापडलेल्या या ऊस उत्पादक शेतकरी आणि गुऱ्हाळघर मालकांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारासुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी या सर्व मागण्यांचे निवेदन कृषीउत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बाबासाहेब लाड यांच्याकडे दिले. शिवाय बाजार समितीकडून 2005 ला जेवढी नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात आली होती त्यापेक्षाही जास्त भरपाई यावेळी देण्यात येईल, असे आश्वासनसुद्धा चेअरमन बाबासाहेब लाड यांनी शेतकऱ्यांना दिले.