ETV Bharat / entertainment

पुन्हा धमकीनं हादरला 'भाईजान'; शूटींग चालू असताना फॅन म्हणाला 'लॉरेन्स बिश्नोईको बुलाऊ क्या' - SALMAN KHAN SECURITY BREACHED

अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाचं शूटींग सुरू असताना फॅननं कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावानं धमकी दिली. त्यामुळे शूटींग लोकेशनवर एकच खळबळ उडाली.

Salman Khan Security Breached
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2024, 6:56 AM IST

Updated : Dec 5, 2024, 7:13 AM IST

मुंबई : सलमान खान याच्या एका चित्रपटाचं दादरला शूटींग सुरू असताना सुरक्षा रक्षक आणि सलमान खानच्या फॅनमध्ये राडा झाला. यावेळी सलमानच्या फॅननं लॉरेन्स बिश्नोई को बुलाऊ क्या, अशी धमकी दिल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे घाबरलेल्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ मुंबई पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत सलमान खान याच्या फॅनला ताब्यात घेतलं. त्यामुळे शूटींग करताना सगळ्यांची पाचावर धारण बसली. चित्रपट अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. मात्र सलमान खानच्या फॅननंच लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं धमकी दिल्यानं बॉलिवूडचा भाईजानही चांगलाच हादरला.

शूटींग पाहण्यास सुरक्षा रक्षकानं रोखल्यानं फॅननं दिली धमकी : दबंग अभिनेता सलमान खान याच्या आगामी चित्रपटाचं शूटींग मुंबईतील दादर परिसरात सुरू होतं. यावेळी सलमान खानच्या एका फॅनला सुरक्षा रक्षकानं शूटींग पाहताना रोखलं. त्यामुळे संतापलेल्या फॅननं सुरक्षा रक्षकांसोबत वाद घातला. यावेळी झालेल्या भांडणात सलमान खानच्या फॅननं लॉरेन्स बिश्नोई को बुलाऊ क्या, अशी धमकी सुरक्षा रक्षकांना दिली. त्यामुळे शूटींगच्या लोकेशनवर मोठी खळबळ उडाली. सुरक्षा रक्षांची मोठी धावाधाव झाली. त्यांनी तत्काळ मुंबई पोलिसांना या धमकीची माहिती दिली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सलमान खानच्या फॅनला ताब्यात घेतलं.

सलमान खान पुन्हा हादरला : चित्रपटाचं शूटींग सुरू असताना सलमान खानच्या फॅननं कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं धमकी दिल्यानं शूटींग लोकेशनवर मोठी खळबळ उडाली. सलमान खानच्या फॅननंच ही धमकी दिल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या तपासात पुढं आली. मात्र या धमकीमुळे सलमान खानला पुन्हा मोठा हादरा बसला आहे. धमकी देण्याऱ्या सलमान खानच्या फॅनला पोलिसांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आणलं आहे. त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खानला पुन्हा धमकी ; 5 कोटी रुपये दे, अन्यथा . . .नियंत्रण कक्षाला लॉरेन्स बिश्नोईच्या कथित भावाचा मेसेज
  2. 'सलमान खान-लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्याला महिनाभरात मारलं जाईल', अभिनेत्याला आणखी एक धमकी
  3. सलमान खानला दिवाळीपूर्वी जीवे मारण्याची धमकी, यावेळी दोन कोटींची मागणी...

Last Updated : Dec 5, 2024, 7:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.