ETV Bharat / state

माऊलीची करुण कहाणी : नवऱ्याला अर्धांगवायू, पाण्यात बुडालेला संसार आता एकटी कसा उभारू? - पाण्यात बुडालेला संसार

गेल्या ८ ते १० दिवसांपासून कोल्हापुरात पुराचा हाहाकार माजला होता. पुराचे पाणी रविवारपासून ओसरायला सुरुवात झाली. सोमवारी पाणी ओसरल्यानंतर आपल्या घराची नेमकी काय स्थिती झाली? हे बघण्यासाठी नागरिकांनी घराकडे धाव घेतली. मात्र, घराची स्थिती बघून त्यांना अश्रू अनावर झाले.

माऊलीची करुण कहाणी
author img

By

Published : Aug 13, 2019, 1:40 PM IST

Updated : Aug 13, 2019, 4:32 PM IST

कोल्हापूर - घरात पाणी आल्यावर आम्ही घर सोडून बाहेर गेलो. आता पूर ओसरल्यावर घरात येऊन बघितले, तर होत्याचे नव्हते झालेले दिसले. मी आणि माझे पती दोघेच राहतो. मात्र, नवऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. आता मी एकटी संसार कसा उभारणार? असा प्रश्न विचारत माऊली चक्क रडायला लागली. शहरातील बुधवार पेठेतील पुराचा फटका बसलेल्या कुटुंबाची ही करुण कहाणी आहे.

माऊलीची करुण कहाणी : नवऱ्याला अर्धांगवायू, पाण्यात बुडालेला संसार आता एकटी कसा उभारू?

गेल्या ८ ते १० दिवसांपासून कोल्हापुरात पुराचा हाहाकार माजला होता. पुराचे पाणी रविवारपासून ओसरायला सुरुवात झाली. सोमवारी पाणी ओसरल्यानंतर आपल्या घराची नेमकी काय स्थिती झाली? हे बघण्यासाठी नागरिकांनी घराकडे धाव घेतली. मात्र, घराची स्थिती बघून त्यांना अश्रू अनावर झाले. काही लोकांनी घराची स्वच्छता करून संसार थाटण्याचा विचार केला. मात्र, घरात जीवनावश्यक वस्तू नाही. पुरामुळे संपूर्ण घरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई होण्याची शक्यता आहे.

शहरातील अनेक घरांमध्ये चिखलाचे साम्राज्य आहे. अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा महापूर होता. असा महापूर आम्ही कधी पाहिला नाही, अशा प्रतिक्रिया अनेक महिला देत आहेत.

Intro:पूर ओसरल्यानंतर शहरातील अनेक नागरिक आता आपल्या घरामध्ये येत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आपलं घर पाण्यात असल्याने पाणी कमी होताच त्यांनी आता आपल्या घरी नेमकी काय अवस्था झाली आहे, नेमके किती गोष्टींचे नुकसान झाले आहे याची चिंता लागून राहिली आहे. सकाळपासूनच कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये लोक आपल्या घराची स्वच्छता करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक गल्ल्या आणि घरांमध्ये अक्षरशः चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. अनेक महिलांना तर आपला संसार पाण्यात बुडाल्याने अश्रू अनावर होत आहेत. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा महापूर आणि असा महापूर आम्ही कधी पाहिला नाही अशा प्रतिक्रिया काही महिलांनी व्यक्त केल्या त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी....

Body:.

Conclusion:.
Last Updated : Aug 13, 2019, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.