ETV Bharat / state

मतपत्रिकेवर निवडणूकांची भाजपला भीती; जयंत पाटील यांचा भाजपवर घणाघात - bjp maharashtra

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने मते मागितली. आमचेच लोक पक्षात घेऊन मते मागत असतील तर, त्यांच्याकडे कोणती नैतिकता राहिली आहे, असा माझा त्यांना प्रश्न आहे.

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
author img

By

Published : Aug 3, 2019, 7:18 PM IST

कोल्हापूर- ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान झाले, की आपले अस्तित्व राहणार नाही. महाराष्ट्रात आपली ताकद नाही, त्यामुळे दिसेल त्यांला पक्षात बोलावण्याचा सपाटा भाजपने लावला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूरात केली.

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

एका खासगी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने मते मागितली. आमचेच लोक पक्षात घेऊन मते मागत असतील तर, त्यांच्याकडे कोणती नैतिकता राहिली आहे, असा माझा त्यांना प्रश्न आहे. कोल्हापुरातील काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे. याबाबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, नेत्यांना कोणती भीती दाखवली. कोणाच्या मागे कोणती चौकशी लावली, हे दोन वेगळे विषय आहेत. पण, आमच्या पक्षातील कोणी पक्षातून जातील असे मला वाटत नाही. कारण सगळेच नेते माझ्या संपर्कात आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेशात शिवराजसिंग आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंग यांनी निवडणुकीपूर्वी अशीच पदयात्रा केली. पण त्या दोघांचेही सरकार पडले. आता, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यात्रा सुरू आहे. त्यांचे सरकार आता पडणार आहे. न केलेल्या कामांचा उहापोह ते करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हे कदापिही मान्य करणार नाही. जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. त्यामुळे, आगामी निवडणुकीत आम्ही त्यांचा नक्की पराभव करू, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Intro:अँकर : ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान झाले की आपले अस्तित्व राहणार नाही याची भीती भाजपला आहे. भाजपला हे सुद्धा माहीत आहे की महाराष्ट्रात आपली ताकद नाही त्यामुळे दिसेल त्यांना पक्षात बोलावण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूरात केली. येथील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. Body:व्हीओ : यावेळी जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस - राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने मते मागितली. आता ते आमचेच लोक पक्षात घेऊन मते मागत असतील तर त्यांच्याकडे कोणती नैतिकता राहिली असा त्यांना माझा सवाल आहे. शिवाय कोल्हापुरातील काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे याबाबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, त्या नेत्यांना कोणती भीती दाखवली कोणाच्या मागे कोणती चौकशी लावली हे दोन वेगळे वेगळे विषय आहेत पण आमच्या पक्षातील कोणी पक्षातून जातील असे मला वाटत नाही. कारण सगळेच नेते माझ्या संपर्कात आहेत. ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश मध्ये शिवराजसिंग आणि छत्तीसगड मध्ये रमण सिंग यांनी निवडणुकीपूर्वी अशीच पदयात्रा केली, पण त्या दोघांचेही सरकार पडले. आता भाजपच्या तिसऱ्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यात्रा सुरू असली तरी आता त्यांचे सरकार सुद्धा आता पडणार आहे. न केलेल्या कामांचा उहापोह ते करीत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हे कदापिही मान्य करणार नाहीत आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरला नाहीये. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांचा नक्की पराभव करून दाखवू असा विश्वास सुद्धा यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.