ETV Bharat / state

Father Killed Son : व्यसनाधीन पोराकडून आयफोनसाठी हट्ट, बाप चिडला अन् केला घात

कोल्हापुरात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सांगली जिल्ह्यातील गोटखिंडीच्या तरुणाच्या खुनाचा उलगडा कागल पोलिसांनी केला आहे. तरुणाने कुटुंबीयाकडे वारंवार आयफोन हवा असल्याचा तगादा लावल्याने वडिलांनी रागाने त्याच्या डोक्यात काठी मारली. या हल्ल्यात अमरसिंह थोरात (30 वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कागल तालुक्यातील बामणी येथे गुरुवारी आढळला होता. अवघ्या 24 तासात पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.

Father Killed Son In Kolhapur
बाप चिडला अन् केला घात
author img

By

Published : Jun 2, 2023, 9:00 PM IST

कोल्हापूर: कागल-निढोरी मार्गाजवळील बामणी गावाच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील रहिवासी अमरसिंह दत्ताजीराव थोरात अशी तरुणाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.

मृतदेह टाकून दोघेही फरार: कुटुंबीयांकडे चौकशी करत असताना वडील दत्ताजीराव थोरात यांनी हत्येची कबुली दिली. वडिलांनी लोखंडी काठीने हल्ला केल्यानंतर अमरसिंह गंभीर जखमी झाला होता; मात्र थोरात कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात न नेता घरीच ठेवले. यामध्ये अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतदेह तब्बल 24 तास घरात ठेवण्यात आला होता. बुधवारी मध्यरात्री चारचाकीच्या डिक्कीमध्ये मृतदेह ठेवून कागल तालुक्यातील बामणी येथील निर्जनस्थळी टाकण्यात आला. यानंतर थोरात बापलेक पसार झाले होते. याप्रकरणी अमरसिंह याचे वडील दत्ताजीराव थोरात आणि भाऊ अभिजित थोरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

'तो' एमपीएससीचा विद्यार्थी: अमरसिंह थोरात हा 2009 पासून पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. 2009 ते 2019 या कालावधीत पुण्यात आणि त्यानंतर दोन वर्षे कोल्हापुरात अमरसिंहने एमपीएससी अभ्यासाची तयारी केली. मात्र, यशाने हुलकावणी दिल्याने तो व्यसनाधीन झाला होता.‌ कुटुंबीयांकडे वारंवार चैनीसाठी पैशाची मागणी अमरसिंह करत असल्याने त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे. पदवीचे शिक्षण घेताना त्याने कुटुंबीयांकडे आयफोनसाठी दीड लाख रुपयांची मागणी केली होती.

तरुणावर प्राणघातक हल्ला: कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तिघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 31 मे, 2023 रोजी घडली आहे. थरारक पाठलाग करत भर वस्तीत हल्ल्याची घटना घडल्याने शिवाजी पेठ परिसरासह शहरात खळबळ उडालीय.

हेही वाचा:

  1. Mumbai Crime : फ्रीजर चोरून नेण्यासाठी ॲपद्वारे टेम्पो बूक केला अन् चोरटे फसले
  2. Vaishali gang rape : वैशालीत सामूहिक बलात्कार, चार आरोपींना अटक
  3. Chhota Rajan : छोटा राजनची नुकसान भरपाईची याचिका, मागितला केवळ एक रुपया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.