कोल्हापूर - लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र तरीही या परिस्थितीमध्ये शेतकरी लढतोय आणि धान्य पिकवत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याचा सन्मान करण्यासाठी आज 16 मे रोजी "शेतकरी सन्मान दिवस"साजरा करावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले होते. त्याच्या त्या आवाहनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
कोरोना अन्नदाता योध्याचा सन्मान करण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक सुरक्षितता राखून 16 मे रोजी सकाळी 9 वाजता आपल्या अंगणात, घरावर अथवा घराजवळील योग्य ठिकाणी देशाचा राष्ट्रध्वज, संघटनेचा झेंडा अथवा कोणतेही कृषी औजारे सोबत 5 ते 10 मिनिटे थांबून शेतकऱ्यांचा सन्मान करावा आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा द्यावा,असे आवाहन शेट्टी यांनी केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष बाब म्हणजे, स्वतः राजू शेट्टी सहकुटुंब 10 मिनिटे शेतीतील अवजारे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन उभे राहिले.
हेही वाचा - ‘भारत माता की जय!’ घोषणा देत श्रमिक विशेष रेल्वे बिहारकडे रवाना
हेही वाचा - कोल्हापूरची जनता ठीक आहे, का मेली हे पाहायला 'ते' आले नाहीत; मंत्री मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांना टोला