ETV Bharat / state

कोल्हापूर: 'पाखऱ्या'च्या वाढदिवसाला राजू शेट्टींची उपस्थिती - राजू शेट्टी लेटेस्ट न्यूज

पाटील कुटुंबियानी आपल्या लाडक्या 'पाख-या' या बैलाचा दुसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. फक्त वाढदिवसच नाही तर पाटील कुटूंबियांनी पाख-याच्या वाढदिवसानिम्मीत्त जवळपास ४०० लोकांचे जेवण सुद्धा देण्यात आले.

'पाखऱ्या'च्या वाढदिवसाला राजू शेट्टींची उपस्थिती

author img

By

Published : Feb 2, 2021, 10:36 AM IST

Updated : Feb 2, 2021, 1:08 PM IST

कोल्हापूर- वाढदिवस प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला महत्वाचा आणि आनंदाचा दिवस. आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसाची प्रत्येकजण तयारी करत असतो. परंतू शेतात राबणाऱ्या बैलाचा वाढदिवस केल्याचे क्वचितच आपल्याला पाहायला मिळते. मात्र, कोल्हापूरातल्या हातकणंगले तालुक्यातील शंकर पाटील या शेतकऱ्यांने आपल्या बैलाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. विशेष म्हणजे शेतकरी नेते राजू शेट्टीही या वाढदिवसाला उपस्थित होते.

कोल्हापूर: 'पाखऱ्या'च्या वाढदिवसाला राजू शेट्टींची उपस्थिती
वाढदिवसानिमित्त गावजेवणहातकणंगले तालुक्यातील भादोले गावातील शेतकरी शंकर पाटील नेहमीच आपल्या जनावरांची चांगल्या पद्धतीने निगा राखत असतात. आता तर त्यांनी जनावरांचा वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली आहे. काल (सोमवारी) पाटील कुटुंबियांनी आपल्या लाडक्या 'पाख-या' या बैलाचा दुसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. फक्त वाढदिवसच नाही तर वाढदिवसानिमित्त जवळपास ४०० लोकांचे जेवणसुद्धा देण्यात आले. खरंतर प्रत्येकाचे आपल्या जनावरांप्रती प्रेम असते. मात्र, भादोले गावातील पाटील कुटुंबीयांनी ज्या पद्धतीने आपल्या लाडक्या बैलाचा थाटामाटात वाढदिवस साजरा केला त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पाखऱ्याला भेटवस्तूही मिळाल्या वाढदिवसाला आलेल्या अनेक मित्रमंडळींनी पाख-याला गिफ्ट सुद्धा आणली होती. यामध्ये गिफ्ट म्हणून सापती, झूल, वेसण, दावणीची दोरी, दोरखंड, नाथ, घुंगरू, भवरकडी, घाटीघुंगूर यासारख्या वस्तूंचा सामावेश होता.

Last Updated : Feb 2, 2021, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.