ETV Bharat / state

Bull on Grampanchayat : शेतात जायला रस्ता मिळेना, शेतकऱ्याने बैल बांधला थेट ग्रामपंचायतच्या दारात - Farmer brought his bull at grampanchayat

( Bull on Grampanchayat ) शेतकऱ्याला शेतात जायला रस्ता नसताना यावर ग्रामपंचायत तोडगा काढत नसल्यामुळे त्या शेतकऱ्याने चक्क ग्रामपंचायतीत आपला बैल आणून बांधला. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे ग्रामसभेपूर्वी हा प्रकार घडला.

Bull on Grampanchayat
शेतकऱ्याने चक्क ग्रामपंचायतीत आपला बैल आणून बांधला
author img

By

Published : Nov 11, 2022, 4:36 PM IST

कोल्हापूर : शेतात जायला रस्ता नव्हता आणि ग्रामपंचायत तोडगा काढत नसल्यामुळे कोल्हापुरातील एका शेतकऱ्याने थेट आपला बैल ग्रामपंचायतीत आणून बांधला ( Bull on Grampanchayat ) आहे. अर्जुन जोंधळे असे या शेतकऱ्याचे नाव असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे राहणारा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सातारा तालुक्यात ही अशाच प्रकारे एका शेतकऱ्याने ग्रामपंचायतीत बैल आणून बांधत अनोखे आंदोलन केले होते. यानंतर आता कोल्हापुरातही अशाच प्रकारचे आंदोलन केल्याने याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. रस्ते काही शेतकऱ्यांनी बंद केल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला. हा प्रश्न तात्काळ सोडवावा याकरीता शेतकरी अर्जुन जोंधळे यांनी ग्रामपंचायतीतच बैल आणून बांधला आणि चारा घालण्याची ग्रामपंचायतकडे मागणी केली.

शेतकऱ्याने चक्क ग्रामपंचायतीत आपला बैल आणून बांधला

ग्रामपंचायतीचा नकार - कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी गावच्या जवळ क्रशर उद्योगाकडे जाणारा रस्ता वनविभागाने काही दिवसांपूर्वी बंद केला. यामुळे येथील हा व्यवसाय ठप्प झाला. व्यवसायिक आणि शेतीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता मिळावा याकरिता व्यवसायिकांचा वनविभागाकडे रस्ता मागणीचा प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या याकरीता ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आवश्यक आहे. मात्र गायरान मधिल उत्खनन व पर्यावरण या प्रकरणी हरित लविदाकडे याची सुनावणी सुरू असल्याने दाखला देण्यास ग्रामपंचायतीने नकार दिला.

थेट ग्रामपंचायतीत आणला बैल - वाद वाढू लागल्याने गुरुवारी गावाची ग्रामसभा घेण्यात आली. मात्र सभा सुरू होण्यापूर्वीच गट नंबर ६३० मधील रस्ता व शेत शिवारात बंद केलेले रस्ते यावरून गोंधळ झाला. सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब झाल्याचे सरपंच शोभाताई खोत यांनी जाहीर केले. मात्र त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घ्यावी व रस्ते खुले करावेत, अशी मागणी लावून धरली. तर यातील एक शेतकरी अर्जुन जोंधळे यांनी आपला बैल थेट ग्रामपंचायती समोर चक्क आणून बांधले. जनावरे उपाशी असून त्यांना चाऱ्याची सोय करता येत नाही. यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर ग्रामपंचायतीत सगळी जनावरे आणून बांधणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.