कोल्हापूर - गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात महाप्रलय यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. अर्धे कोल्हापूर आता पाण्यात आहे.
कोल्हापुरात ज्या ठिकाणी रोड आहेत, त्या ठिकाणी आता नद्या वाहताना पाहायला मिळत आहेत. अख्खे शहर जलमय झाले आहे. या शहराची बुधवारी सायंकाळपर्यंत कशी परिस्थिती झाली आहे याचे खास ड्रोन व्हिज्युअल्स ईटीव्ही भारत कडे. याचे चित्रीकरण केले आहे शिवम बोधे यांनी. पावसाचा जोर अध्याप कायम असल्याने पूरस्थिती अध्याप जैसे-थे असून, त्याहूनही अधिक भयंकर परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाण्याची पातळी सध्या 56 फुटांकडे वाटचाल करत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास याहूनही अधिक गंभीर परिस्थतीचे संकट कोल्हापूर जिल्ह्यावर येण्याची चिन्हे आहेत.