ETV Bharat / state

Vishalgarh Encroachment: विशाळगड येथे दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिक्रमण काढण्याचे काम सुरू

विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण (Vishalgarh Encroachment) झाले आहे. त्याबद्दल माजी खासदार संभाजीराजे यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी तिथे जाऊन स्वतः पाहणी केली. आता अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली असून आज विशाळगडाच्या पायथ्याला झालेले अतिक्रमण (Encroachment removal work Vishalgarh) काढण्यात आले. (Latest news from Kolhapur) आज सलग दुसऱ्या दिवशी हे काम सुरू होते.

Vishalgarh Encroachment
विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण
author img

By

Published : Dec 9, 2022, 7:02 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर वनविभागाने सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा विशाळगड येथील अतिक्रमण (Vishalgarh Encroachment) काढण्याची कारवाई केली आहे. काल गुरुवारीसुद्धा काही अतिक्रमणे करण्यात आली होती. आज दुसऱ्या दिवशीसुद्धा येथील वनविभागाच्या हद्दीत येणारी अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू (Encroachment removal work Vishalgarh) होते. गेल्या अनेक दिवसांपासून शिवप्रेमींकडून अतिक्रमण काढण्याबाबत मागणी करण्यात आली होती. (Latest news from Kolhapur) आता प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात झाल्याने याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

गडावरही अतिक्रमण : दरम्यान, विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याबद्दल माजी खासदार संभाजीराजे यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी तिथे जाऊन स्वतः पाहणी केली. त्यानंतर याकडे राज्यकर्ते आणि विरोधी गटाच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती.

अतिक्रमणाबाबत आश्वासन : त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक सुद्धा पार पडली. महाशिवरात्री पर्यंत अतिक्रमण काढण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार आता अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली असून आज विशाळगडाच्या पायथ्याला झालेले अतिक्रमण काढण्यात आले. आज सलग दुसऱ्या दिवशी हे काम सुरू होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.