ETV Bharat / state

इचलकरंजी नगरपरिषदेतील कर्मचार्‍यांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा उतरणार; आमदार आवाडे यांची घोषणा

इचलकरंजी नगरपरिषदेतील 1 हजार 241 कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. या कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या प्रकरणी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेतला असून सर्वांचा प्रत्येकी 10 लाखांचा विमा उतरवण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

MLA Prakash Awade
आमदार प्रकाश आवाडे
author img

By

Published : May 6, 2020, 8:40 AM IST

कोल्हापूर - कोरोना विरुध्दच्या लढाईत इचलकरंजी नगरपरिषदेतील 1 हजार 241 कर्मचार्‍यांचा सेवा देत आहेत. या सर्व कर्मचाऱयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार असल्याची घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत आमदार आवाडे यांनी ही घोषणा केली. यावेळी नगरपरिषदेतील कर्मचाऱयांना पीपीई किटही प्रदान केले आहेत.

नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आमदार प्रकाश आवाडे

मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे. इचलकरंजी नगरपरिषदेतील 1 हजार 241 कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. या कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या प्रकरणी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेतला असून सर्वांचा प्रत्येकी 10 लाखांचा विमा उतरवण्याची त्यांनी घोषणा केली आहे. हा विमा एक वर्षासाठी असणार आहे.

आवाडे यांच्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. शहरातील दैनंदिन साफसफाई आणि कचरा उचलण्याचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कसलेही संरक्षक किट नसल्याची बाब आवाडे यांच्या लक्षात आली. त्यांनी सर्व कर्मचार्‍यांसाठी पीपीई किट तयार करुन घेत नगरपरिषदेकडील 650 आणि कंत्राटी 350 अशा 1 हजार कर्मचार्‍यांना किट दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.